या कारणामुळे सलमान खान यावर्षी सेलिब्रेट करणार नाही त्याचा वाढदिवस आणि आणि न्यू इअर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 05:40 PM2020-12-17T17:40:00+5:302020-12-17T17:46:58+5:30

पहिल्यांदाच यावर्षी सलमान त्याचा वाढदिवस साजरा करणार नाहीय.

Salman khan will not celebrate his birthday and new year 2021 here is the reason why | या कारणामुळे सलमान खान यावर्षी सेलिब्रेट करणार नाही त्याचा वाढदिवस आणि आणि न्यू इअर

या कारणामुळे सलमान खान यावर्षी सेलिब्रेट करणार नाही त्याचा वाढदिवस आणि आणि न्यू इअर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे शेड्यूल सध्या खूप व्यस्त आहे. 'बिग बॉस 14' या टीव्ही रिअ‍ॅलिटी शोच्या होस्टिंगबरोबरच भाईजान आपल्या सिनेमांचे शूटिंगदेखील करतो आहे. या दरम्यान अशी बातमी येते आहे की,  आपल्या व्यस्त शेड्यूलमुळे यंदा भाईजान आपला वाढदिवस साजरा करणार नाही. दरवर्षी सलमान खानचा वाढदिवस त्याच्या फार्महाऊसमध्ये साजरा केला जातो, परंतु स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार यावर्षी तो काहीही करणार नाही. वाढदिवशी सलमान खान त्याच्या एका सिनेमाचे शूटिंग करणार आहे.

सलमान खानच्या खास मित्राने वेबसाइटशी बोलताना सांगितले की, "आम्ही पहिल्यांदाच सलमानचा वाढदिवस आणि नवीन वर्ष त्यांच्या फार्म हाऊसमध्ये साजरा करत नाही असे होत आहे." मला वाटत नाही वाटत या वर्षी कोणतेही सेलिब्रेशन होईल. काही मीडिया रिपोर्टसमध्ये वाचले आहे की, भाईजानच्या वाढदिवशी एक छोटासे सेलिब्रेशन होईल, परंतु जोवर मला माहिती आहे, सलमान त्याच्या वाढदिवशी पहिल्यांदाच आगामी 'अंतिम' सिनेमाचे शूटिंग करणार आहे.  नवीन वर्षाच्या निमित्ताने तो त्याचा मेहुणा आयुष शर्मासोबत शूट करणार आहे.

सलमान सध्या महेश मांजरेकर दिग्दर्शित 'अंतिम' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात सलमानबरोबर आयुषही दिसणार आहे. महेश मांजरेकरच्या मुलगी सई मांजरेकरसुद्धा सिनेमात दिसणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत, परंतु महेश यांनी यास नकार दिला आहे. 

 

 

Web Title: Salman khan will not celebrate his birthday and new year 2021 here is the reason why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.