‘जुडवा २’मध्ये सलमान खान दिसणार का डबल रोलमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2017 04:07 PM2017-01-16T16:07:17+5:302017-01-16T16:07:17+5:30

नव्वदच्या दशकात सलमान खानच्या प्रचंड गाजलेल्या ‘जुडवा’ चित्रपटाचा रिमेक ‘जुडवा २’मध्ये वरुण धवन प्रमुख भूमिका करीत आहे. या रिमेकमध्ये ...

Salman Khan will appear in the double role of 'Juhiwa 2'? | ‘जुडवा २’मध्ये सलमान खान दिसणार का डबल रोलमध्ये?

‘जुडवा २’मध्ये सलमान खान दिसणार का डबल रोलमध्ये?

googlenewsNext
्वदच्या दशकात सलमान खानच्या प्रचंड गाजलेल्या ‘जुडवा’ चित्रपटाचा रिमेक ‘जुडवा २’मध्ये वरुण धवन प्रमुख भूमिका करीत आहे. या रिमेकमध्ये सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळणार आहे हे तर आम्ही तुम्हाला याआधीच सांगितलेले आहे. पण आता अशी माहिती मिळतेय की, सलमानचा हा गेस्ट अ‍ॅपिअरन्ससुद्धा डबल रोल असणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जुडवा २’मध्ये सलमान मूळ चित्रपटातील ‘राजा’ आणि ‘प्रेम’ या व्यक्तिरेखा साकारणार आहे. वीस वर्षांनंतर ‘राजा’ आणि ‘प्रेम’ मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहेत. सलमानचे हे डबल रोल वरुणच्या डबल रोलशी भेटणार असून या चित्रपटाचा हा हायलाईट सिक्वेन्स असणार आहे. त्यामुळे त्याची विशेष तयारी केली जात आहे.

१९९७ साली आलेल्या ‘जुडवा’ सिनेमात सलमानसोबत करिश्मा कपूर आणि रंभा दोन अभिनेत्रींनी काम केले होते. त्यांनादेखील ‘जुडवा २’मध्ये पाहुणे कलाकार म्हणून घेण्याची निर्मात्यांची योजना आहे. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिड धवनच हा रिमेक बनवत असून साजीद नाडियादवाला निर्माते आहेत. सलमानने अलिकडे ‘किक’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमांत डबल रोल केले आहेत.

तत्पूवी सलमानने ‘करण-अर्जुन’ सिनेमाच्या सेटवरील हृतिक-शाहरुखसोबतचा एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो ट्विटरवर शेअर करून दिग्दर्शक राकेश रोशन यांचे हा चित्रपट तयार केल्याबद्दल आभार मानले. विशेष म्हणजे हृतिकचा बॉलीवूड डेब्यू ज्या दिवशी (१४ जानेवारी) झाला त्याच दिवशी सलमानने हे ट्विट करून ‘रईस’ आणि ‘काबील’साठी शुभेच्छा दिल्या.

सलमान आणि हृतिकचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून बिघडलेले आहेत. हृतिकच्या ‘गुजारिश’ सिनेमाबद्दल सलमानने केलेल्या शेरेबाजीमुळे दोघांमध्ये वाद झाला होता. तेव्हापासून ते एकमेकांपासून अंतर राखून असतात. एवढ्या वर्षांत सलमानने प्रथमच हृतिकचा उल्लेख केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले.

Web Title: Salman Khan will appear in the double role of 'Juhiwa 2'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.