मैंने प्यार कियाच्या सेटवर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत या कारणामुळे बोलत नव्हता सलमान खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 17:43 IST2021-06-01T17:40:14+5:302021-06-01T17:43:42+5:30

मैंने प्यार किया या चित्रपटाच्या सेटवर सलमान लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत बोलत नव्हता. लक्ष्मीकांत यांनीच याविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. 

Salman Khan was not talking to Laxmikant Berde on the set of Maine Pyaar Kiya for this reason | मैंने प्यार कियाच्या सेटवर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत या कारणामुळे बोलत नव्हता सलमान खान

मैंने प्यार कियाच्या सेटवर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत या कारणामुळे बोलत नव्हता सलमान खान

ठळक मुद्देमैंने प्यार किया हा सलमानचा नायक म्हणून पहिला चित्रपट होता तर लक्ष्मीकांत यांनी या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

मैंने प्यार किया या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटाची कथा, गाणी, या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. या चित्रपटात सलमान खान आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे अगदी घनिष्ट मित्र असल्याचे दाखवले होते. पण या चित्रपटाच्या सेटवर सलमान लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत बोलत नव्हता. लक्ष्मीकांत यांनीच याविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. 

मैंने प्यार किया हा सलमानचा नायक म्हणून पहिला चित्रपट होता तर लक्ष्मीकांत यांनी या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. लक्ष्मीकांत हे त्याकाळात मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले होते. 

त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मी मराठी चित्रपटसृष्टीत एकाहून एक हिट चित्रपट देत असल्याने हिंदीतील कलाकार मला काहीसे घाबरून होते. त्यामुळे काहींनी सलमानला सांगितले होते की, तो ऐनवेळेला संवादात काहीतरी एडिशन करतो. त्यामुळे त्याच्यापासून सावधान राहा... यामुळे सलमान माझ्याशी बोलतच नव्हता. भाग्यश्री मराठी असल्याने आम्ही सेटवर मस्त मराठीत गप्पा मारायचो. अखेर मीच सलमानला स्वतःहून विचारले की काय झाले आहे... जोपर्यंत आपले ट्युनिंग चांगले होत नाही, तोपर्यंत आपले सीन चांगले होणार नाहीत. आमच्या एका एकत्रित सीनच्यावेळेस माझ्या लक्षात आले की, या सीनमध्ये आमच्यात चांगले ट्युनिंग नसेल तर लोक केवळ माझ्याकडेच पाहातील. त्यामुळे या सीनमध्ये मला घेऊ नकोस अशी विनंती मी दिग्दर्शकाला केली. पण ही गोष्ट सलमानला कळल्यावर त्याला त्याची चूक कळली आणि त्यानंतर आमचे ट्युनिंग खूपच चांगले झाले. 

Web Title: Salman Khan was not talking to Laxmikant Berde on the set of Maine Pyaar Kiya for this reason