काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानची केली होती कसून चौकशी; पहा १९ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 16:55 IST2017-09-02T11:25:14+5:302017-09-02T16:55:14+5:30

कस्टडीमधील या व्हिडीओमध्ये सलमान अधिकाºयांच्या प्रश्नांवर बिथरताना दिसतो; तसेच सही करताना बिचकतो, पहा १९ वर्षांपूर्वीचा सीक्रेट व्हिडीओ!

Salman Khan was involved in blackbuck hunting; Watch 19 years ago video! | काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानची केली होती कसून चौकशी; पहा १९ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ!

काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानची केली होती कसून चौकशी; पहा १९ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ!

लिवूडचा दबंग सलमान खान याचे वादाशी जुने नाते आहे. त्यामुळे तो जेव्हा-केव्हा चर्चेत येतो, तेव्हा वाद हा त्याच्यासोबत असतोच. मात्र हा वाद खºया अर्थाने १९९८ मध्ये त्याच्यावर दाखल झालेल्या काळवीट शिकार प्रकरणाने त्याच्या मागे लागला. ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानने त्याच्या बंदुकीने काळवीट जातीचे हरिण मारल्याचा त्याच्यावर गुन्हा होता. ज्या हरणाची सलमानने शिकार केल्याचे म्हटले होते, तो एक संरक्षित प्राणी तर आहेच शिवाय राजस्थानातील अनेक भागांमध्ये या प्राण्याचे पूजनही केले जाते. असो, सलमानवर शिकारीचे हे प्रकरण तब्बल १९ वर्ष चालले. त्यानंतर न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्तही केले. मात्र सध्या या प्रकरणातील सलमानच्या चौकशीदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

१९९८ सालातल्या या व्हिडीओमध्ये सलमान खानची काही अधिकारी चौकशी करीत आहेत. तसेच काही कागदांवर त्याची सही घेताना दिसत आहेत. वास्तविक व्हिडीओमध्ये हे पूर्णत: समजत नाही की, नेमके काय घडत आहे. मात्र सलमान संबंधित अधिकाºयांच्या प्रश्नांमुळे बिथरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्याचबरोबर सलमान कशा पद्धतीने चौकशीचा सामना करीत आहे, हेही व्हिडीओमधून दिसून येते. सलमानसह अधिकारी ज्या रूममध्ये बसलेले आहेत, त्या रूममधील वातावरण खूपच गंभीर असल्याचे दिसून येते. मात्र अशातही सलमान सिगारेटचे रिकामे पॅकेट हातात घेऊन अधिकाºयांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसतो. परंतु अधिकाºयांनी सांगितलेल्या कागदांवर सही करताना तो बिचकत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते. 



२ मिनिटे पाच सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत यु-ट्यूबवर आठ लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. हा व्हिडीओ १९ वर्षांपूर्वीचा असल्याने त्यात सलमानचा त्यावेळी कसा रूबाब होता, हे स्पष्टपणे दिसून येते. खरं तर त्यावेळी त्याला या प्रकरणाचे फारसे गांभीर्य कळाले नसावे, असेच दिसून येते. तो ज्या पद्धतीने अधिकाºयांसमोर एका लाकडी खुर्चीवर बसलेला दिसतो, त्यावरून तो या प्रकरणाबाबत किती गंभीर असेल हे कळून चुकते. 

असो, सलमानच्या वर्क फ्रंटविषयी सांगायचे झाल्यास यावर्षी रिलीज झालेल्या त्याच्या ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नव्हता. सध्या तो ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा त्याच्याच ‘एक था टायगर’ चित्रपटाचा सीक्वल आहे. आता हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर काय धमाल करणार हे बघणे मजेशीर ठरेल. 

Web Title: Salman Khan was involved in blackbuck hunting; Watch 19 years ago video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.