यशराज फिल्म्सने सलमानला दिला धोका??
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 17:06 IST2016-08-04T11:36:49+5:302016-08-04T17:06:49+5:30
सध्या बॉलिवूडमध्ये एक बातमी चर्चेचा विषय ठरली आहे. होय, यशराज बॅनर आणि ‘सुलतान’ सलमान खान यांच्यात बिनसल्याची बातमी आहे. ...
.jpg)
यशराज फिल्म्सने सलमानला दिला धोका??
स ्या बॉलिवूडमध्ये एक बातमी चर्चेचा विषय ठरली आहे. होय, यशराज बॅनर आणि ‘सुलतान’ सलमान खान यांच्यात बिनसल्याची बातमी आहे. होय, एका दैनिकाने केलेल्या दाव्यानुसार, यशराज फिल्म्सने जाणीवपूर्वक ‘सुलतान’चे बॉक्सआॅफिसवरील कलेक्शन अर्थात ‘सुलतान’चा बिझनेस दडवून ठेवला. कारण ‘सुलतान’ने ३०० कोटींच्या वर बिझनेस केलाच तर त्यातील एक मोठा वाटा सलमानला मिळणार होता. तसा करारच झाला होता. सलमानच्या फॅन्सनी#YRFStopReducingSULTANFigures हा हॅशटॅग ट्रेडिंग करायला सुरुवात केली आणि या बातमीची चर्चा सुरु झाली. यशराजने खरोखरीच ‘सुलतान’चा बिझनेस लपवण्याचे प्रयत्न केले असतील तर सलमान ‘सुलतान’ नंतर पुन्हा यशराज बॅनरसोबत कदाचितच काम करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य चोपडाने सलमानला ‘सुलतान’ची आॅफर दिली तेव्हाच सलमानने आपल्या अटी स्पष्ट केल्या होत्या. ‘धूम ३’ आणि ‘फॅन’साठी आमीर व शाहरूखला वाटा दिला गेला. त्याचप्रमाणे आपल्यालाही ८०-२० वाटा हवा, असे सलमानने स्पष्ट केले होते. साहजिक जितके जास्त कलेक्शन तितका सलमानचा वाटा मोठा. त्यामुळेच यशराज बॅनरने ‘सुलतान’चा खरा बिझनेस लपवण्याचा खटाटोप केला. सूत्रांच्या मते, ‘एक था टायगर’ या चित्रपटावेळीही यशराज फिल्म्सने असेच केले होते. चित्रपटाचे २०० कोटींपेक्षा अधिक बिझनेस केल्याचे मानले जाते. याऊपरही चित्रपटाने १९६ कोटीं बिझनेस झाल्याचे यशराजने जाहिर केले. आता हे गणित न समजण्याइतपत सलमान दूधखुळा निश्चितच नाही. याऊपरही सलमान पुन्हा यशराजच्या चित्रपटात दिसला तर ते आश्चर्यच मानायला हवे..होय ना!