Ganesh Festival 2019 : बाप्पाला दिला निरोप, डान्स करताना दिसला भाईजान, शिल्पानेही धरला ठेका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 14:30 IST2019-09-04T14:29:58+5:302019-09-04T14:30:55+5:30
‘दबंग 3’च्या शूटींगमधून वेळ काढून सलमान बाप्पाच्या दर्शनासाठी आला. संपूर्ण कुटुंबासोबत त्याने गणरायाची पूजाअर्चना केली.

Ganesh Festival 2019 : बाप्पाला दिला निरोप, डान्स करताना दिसला भाईजान, शिल्पानेही धरला ठेका
संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात आहे. बॉलिवूड कलाकारांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिच्या घरीही दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना झाली आणि काल त्याचे विसर्जन झाले.
‘दबंग 3’च्या शूटींगमधून वेळ काढून सलमान बाप्पाच्या दर्शनासाठी आला. संपूर्ण कुटुंबासोबत त्याने गणरायाची पूजाअर्चना केली.
बाप्पाला निरोप देण्यापूर्वी मोठी आरती करण्यात आली. यावेळी सलमान खान बहिण अर्पिता हिचा मुलगा अहिल याच्या सोबत गणपतीची आरती करताना दिसून आला.
बाप्पाच्या विसर्जनावेळी भाईजान मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला. ढोल ताशांच्या तालावर तो चांगलाच थिरकला.
कधी स्वरा भास्कर तर कधी डेजी शाहसोबत त्याने ठेका धरला. त्याचे डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच त्याचा ‘दबंग 3’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून ‘बिग बॉस’चे सीझन 13 होस्ट करताना तो दिसणार आहे.
शिल्पा शेट्टीनेही दिला बाप्पाला निरोप
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनेही आपल्या संपूर्ण कुटुंबासह बाप्पाला निरोप दिला. यावेळी शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रा व मुलगा विहानसोबत जबरदस्त डान्स केला. ‘बाप्पाला निरोप देणे नेहमीच कठीण असते. आमचे गन्नू राजा परतीच्या प्रवासाला निघाले. पण पुढच्या वर्षी ते पुन्हा आमच्या घरी येणार आहेत....,’ असे शिल्पाने विसर्जनाचा व्हिडीओ शेअर करताना लिहिले.