काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने सलमान खानला ठोठावली पाच वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 14:15 IST2018-04-05T06:52:23+5:302018-04-05T14:15:13+5:30

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवले आहे. अवैद्यरीत्या शस्त्रास्त्रे बाळगणे आणि त्याचा शिकारीसाठी वापर केल्याचा ...

Salman Khan sentenced to five-year sentence by Jodhpur sessions court | काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने सलमान खानला ठोठावली पाच वर्षांची शिक्षा

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने सलमान खानला ठोठावली पाच वर्षांची शिक्षा

ळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवले आहे. अवैद्यरीत्या शस्त्रास्त्रे बाळगणे आणि त्याचा शिकारीसाठी वापर केल्याचा सलमानवर आरोप होता. सलमान खानने १८ वर्षांपूर्वी हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यादरम्यान कांकाणी गावात काळवीटाची शिकार केली असल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्या केससंबंधी अंतिम सुनावणी करण्यात आली. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड सुनावला असून त्याची रवानगी सेंट्रल जेलमध्ये होणार आहे. यावेळी न्यायालयात सलमानसोबत त्याची बहीण अर्पिता आणि अल्विरा उपस्थित होत्या. तर अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, निलम, तब्बू यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 
काही दिवसांपूर्वीच जोधपूर न्यायालयाने सलमानला मोठा दिलासा देत त्याची याप्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती. परंतु राज्य सरकारने सेशन कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत सलमानला निर्दोष करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर सलमानला एक नोटीस देत त्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
१८ वर्षं जुन्या असलेल्या या प्रकरणात नव्याने २० साक्षीदार तपासण्यात आले. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’च्या शूटींगदरम्यान सलमान खान आणि इतर आरोपी तेथील घोडा फार्म हाऊस येथे थांबले होते. यादरम्यान भवाद गावात २७ आणि २८ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. या शिकारीसाठी वापरण्यात आलेले शस्त्र हे विना परवाना असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. सलमानवर हरीण शिकारीचे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी काळवीट आणि हरीण शिकारीच्या दोन प्रकरणात स्थानिक न्यायालयांनी त्याला शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. तत्पूर्वी स्थानिक न्यायालयाच्या निकालामुळे त्याची काही काळ कारागृहातही रवानगी करण्यात आली होती. पुढे उच्च न्यायालयात सबळ पुरावे नसल्याकारणाने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. 
सलमानसोबत त्यावेळी हम साथ साथ या चित्रपटातील त्याचे सहकलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम हेदेखील होते. याप्रकरणी सलमानला स्थानिक न्यायालयाने १ वर्ष आणि पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर उच्च न्यायालयात सलमानने याविरोधात अपील केले होते, पुराव्यांअभावी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. 

Also Read : ​काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने सलमान खानला ठरवले दोषी

Web Title: Salman Khan sentenced to five-year sentence by Jodhpur sessions court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.