सलमान खान म्हणतो, कधीच करणार नाही निगेटीव्ह रोल; वाचा काय आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 21:52 IST2018-09-09T21:51:14+5:302018-09-09T21:52:28+5:30

सलमान खान बॉलिवूडच्या सर्वाधिक फॅन फॉलोर्इंग स्टारपैकी एक आहे. हेच कारण आहे की, सलमानने आयुष्यात कधीही निगेटीव्ह रोल अर्थात नकारात्मक भूमिका न करण्याचा निर्णय घेतला आहे.

salman khan said will never do negetive role in life indication for dhoom 4 | सलमान खान म्हणतो, कधीच करणार नाही निगेटीव्ह रोल; वाचा काय आहे कारण!!

सलमान खान म्हणतो, कधीच करणार नाही निगेटीव्ह रोल; वाचा काय आहे कारण!!

सलमान खान बॉलिवूडच्या सर्वाधिक फॅन फॉलोर्इंग स्टारपैकी एक आहे. देशातचं नाही तर संपूर्ण जगात त्याचे चाहते आहेत.  चाहत्यांमध्ये भाई नावाने ओळखल्या जाणा-या सलमानने गेल्या काही वर्षांत अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. या चित्रपटांतील त्याच्या अनेक भूमिका आयकॉनिक ठरल्या. विशेषत: तरूणांमध्ये त्याच्या या भूमिका प्रचंड लोकप्रीय झाल्यात. हेच कारण आहे की, सलमानने आयुष्यात कधीही निगेटीव्ह रोल अर्थात नकारात्मक भूमिका न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अलीकडे एका मुलाखतीत सलमान यावर बोलला. मी अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. चित्रपटात अ‍ॅक्टर्स ज्या भूमिका करतात, अनेकदा चाहते त्याचे अनुकरण करताना दिसतात. चाहते अगदी आंधळेपणाने आपल्या आवडत्या स्टार्सचे कॅरेक्टर आणि त्याची स्टाईल कॉपी करतात. त्यामुळेचं कधीही निगेटीव्ह रोल न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सलमान या मुलाखतीत म्हणाला.
गेल्या काही दिवसांपासून ‘धूम4’ची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात सलमान निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार, अशी खबर काही दिवसांपूर्वी आली होती. पण आता सलमानच्या या खुलाशानंतर कदाचित ही शक्यता मावळली आहे. सलमानने स्वत:च या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
तूर्तास सलमान खान ‘भारत’ चित्रपटात व्यस्त आहे. याशिवाय बिग बॉसचे १२ वे सीझन होस्ट करतानाही तो दिसणार आहे.
 

Web Title: salman khan said will never do negetive role in life indication for dhoom 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.