'द बुल' सिनेमात भाईजानसोबत झळकणार साऊथ अभिनेत्री, 13 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 05:23 PM2023-12-30T17:23:53+5:302023-12-30T17:24:59+5:30

सलमान खानच्या 'द बुल' सिनेमाची घोषणा आधीच झाली आहे.

salman khan s next movie The bull south actress will share screen with him | 'द बुल' सिनेमात भाईजानसोबत झळकणार साऊथ अभिनेत्री, 13 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक

'द बुल' सिनेमात भाईजानसोबत झळकणार साऊथ अभिनेत्री, 13 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. सिनेमाने रेकॉर्डतोड कामगिरी केली नसली तरी बॉक्सऑफिसवर बऱ्यापैकी यश मिळवलं. आता भाईजानच्या आगामी सिनेमांची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यापैकीच एक म्हणजे 'द बुल' (The Bull). मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमात सलमानसोबत दाक्षिणात्य सिनेमातील आघाडीची अभिनेत्री झळकणार आहे. विष्णु वर्धन सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. 

सलमान खानच्या 'द बुल' सिनेमाची घोषणा आधीच झाली आहे. तेव्हापासूनच सिनेमाची उत्सुकता ताणली आहे. माध्यम रिपोर्टनुसार, 'द बुल' मध्ये साऊथ अभिनेत्री तृष्णा कृष्णन (Trisha Krishnan) भूमिका साकारणार आहे. अद्याप मेकर्स किंवा अभिनेत्रीकडून याबाबतची स्पष्टता आलेली नाही. मात्र असं झालं तर सलमान खानला साऊथ अभिनेत्रीसोबत बघण्यासाठी चाहते उत्सुक असणार आहेत. तृषा कृष्णनने 2010 साली अक्षय कुमारच्या 'खट्टा मीठा' सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर ती पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसली नाही. 'द बुल'ची ऑफर तिने स्वीकारली तर तब्बल १३ वर्षांनी ती पुन्हा हिंदी सिनेमात दिसेल. 
 
तृषा कृष्णन साऊथमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतंच तिने पोन्नियन सेल्वन, लियो या सिनेमांमध्ये भूमिका साकारली. लियो सिनेमावरुन सध्या तृषा आणि तमिळचे प्रसिद्ध खलनायक मन्सूर अली खान यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे.

तर दुसरीकडे सलमान खानचे 'द बुल' शिवाय 'प्रेम की शादी','टायगर व्हर्सेस पठाण' हे चित्रपट येणार आहेत. यासोबतच करण जोहर आणि सलमान खान एका प्रोजेक्टवर काम करत आहेत. 

Web Title: salman khan s next movie The bull south actress will share screen with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.