'प्रेम की शादी' मधून भाईजानचा पत्ता कट? 'या' अभिनेत्याने सलमानकडून हिरावली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 11:32 AM2024-03-06T11:32:47+5:302024-03-06T11:34:26+5:30

सूरज बडजात्यांनी त्यांच्या लाडक्या प्रेमला काढलं? या सुप्रसिद्ध अभिनेत्याला मिळाली प्रेमची भूमिका

salman khan replaced by shahid kapoor in movie prem ki shaadi by suraj barjatya | 'प्रेम की शादी' मधून भाईजानचा पत्ता कट? 'या' अभिनेत्याने सलमानकडून हिरावली भूमिका

'प्रेम की शादी' मधून भाईजानचा पत्ता कट? 'या' अभिनेत्याने सलमानकडून हिरावली भूमिका

'प्रेम' म्हणजे सलमान खान हे समीकरणच जणू लागू झालंय. जवळपास १५ सिनेमांमध्ये सलमान खानने प्रेमची भूमिका साकारली. सूरज बडजात्यांच्या सिनेमात सलमानने साकारलेली प्रेमची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. पण आता एक मोठी बातमी समोर येतेय. सूरज बडजात्यांच्या आगामी 'प्रेम की शादी' सिनेमात सलमान नाही तर बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता भूमिका साकरणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'प्रेम की शादी' मधून सलमान खानची जागा शाहीद कपूरने घेतली आहे. शाहिद आता या चित्रपटात सलमानऐवजी प्रेमची भूमिका साकारणार आहे. पीपिंगमूनच्या रिपोर्टनुसार, आता 'प्रेम की शादी' मध्ये सलमानच्या जागी शाहिद कपूरची वर्णी लागल्याची चर्चा आहे. मात्र निर्माते आणि शाहिदकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

गेल्या वर्षी, 2023 मध्ये एका मुलाखतीत सूरज बडजात्याने स्वतः सलमान खानसोबत एका नवीन प्रोजेक्टवर काम करणार असल्याची पुष्टी केली होती. त्यांनी सांगितले होते की, ते दोघेही लवकरच नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. या बातमीपासून चाहते त्यांच्या नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत होते. आता सलमानच्या रिप्लेसमेंटची बातमी येत आहे. अलीकडेच मिड-डेच्या एका वृत्तात म्हटले होते की, "दोघांमध्ये बरेच मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला होता."

Web Title: salman khan replaced by shahid kapoor in movie prem ki shaadi by suraj barjatya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.