एकीकडे बिश्नोई गँगकडून धमक्या, तिकडे हैदराबादमध्ये पोहचला सलमान खान, काय कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 13:55 IST2024-11-03T13:54:43+5:302024-11-03T13:55:12+5:30
सलमान आता हैदराबादला पोहचला आहे.

एकीकडे बिश्नोई गँगकडून धमक्या, तिकडे हैदराबादमध्ये पोहचला सलमान खान, काय कारण?
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा कायम चर्चेत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून तो कायम लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचं मोठं कारण म्हणजे लॉरेन्स बिश्नोई गँगकडून त्याला सातत्याने धमक्या येत आहेत. त्याच्या घरावरही हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवल्यानंतरही वारंवार त्याच्या जीवाला धोका असल्याचे फोन येत आहेत. पण, या गोष्टीला घाबरून घरात बसणारा सलमान खान नाही, हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं.
'सिंकदर' सिनेमाच्या शुटिंगसाठी सलमान आता हैदराबादला पोहचला आहे. हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेसमध्ये सिनेमाचे शुटिंग होणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राजवाडा हा दिव्याने सजलेला पाहायला मिळतोय. सलमानसाठी ही जागा खास आहे. कारण इथेच त्याची बहीण अर्पिताचा विवाह आयुष शर्मासोबत झाला होता.
'सिंकदर' हा सिनेमा 2025 साली ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ए आर मुरुगदास करत आहेत. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, सुनील शेट्टी आणि काजल अग्रवाल यांच्याही भूमिका आहेत. तर सलमानचा नुकताच 'सिंघम अगेन'मध्ये कॅमिओ पाहायला मिळाला. सलमानने रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटात कॅमिओ केला आहे. 'दबंग' चित्रपटातील चुलबुल पांडेच्या भुमिकेत तो चित्रपटात काही सेकंदांसाठी दिसला.