"हा तर मॉर्निंग वॉक...", सलमान खानचा रॅम्प वॉक पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:56 IST2025-10-15T12:56:26+5:302025-10-15T12:56:56+5:30
भाईजानच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका शोमध्ये सलमान रॅम्प वॉक करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

"हा तर मॉर्निंग वॉक...", सलमान खानचा रॅम्प वॉक पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे लाखो चाहते आहेत. सलमान सध्या 'बिग बॉस १९'मुळे चर्चेत आहे. पण भाईजानच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका शोमध्ये सलमान रॅम्प वॉक करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. भाईजानचा रॅम्प वॉक बघून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
सलमानने डिझायनर विक्रम फडनीस यांच्या शोमध्ये रॅम्प वॉक केला. काळ्या रंगाचा डिझायनर ब्लेझर त्याने परिधान केला होता. रॅम्प वॉक करताना भाईजानचा स्वॅग पाहायला मिळाला. सलमानचा रॅम्प वॉक बघून रितेश देशमुख, सुहाना खानही थक्क झाले. फॅशन शोमधील सलमानचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत भाईजानचं कौतुक केलं आहे.
एकाने कमेंट करत "हा रॅम्प वॉक कमी आणि मॉर्निंग वॉक जास्त वाटतोय", असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "याचा चार्म कधीच संपणार नाही", अशी कमेंट केली आहे. "असं वाटतंय की सलमान त्याच्या तिशीत आहे", असंही एका युजरने म्हटलं आहे. भाईजान पहिल्यांदाच रॅम्प वॉक करताना दिसून आला. त्यामुळे चाहत्यांकडून त्याचं कौतुक होत आहे.