सलमान खानने मुंबईत भाड्यानं घेतला डुप्लेक्स फ्लॅट, महिन्याचं भाडं ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 12:02 PM2021-10-18T12:02:25+5:302021-10-18T12:03:32+5:30

सलमानवर घर भाड्यानं घेण्याची वेळ का आली? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. तेव्हा वाचा, काय आहे भाईजानचा प्लान

Salman Khan Pays 8 Lakh 25 Thousand Rupees Monthly Rent For Duplex In Bandra | सलमान खानने मुंबईत भाड्यानं घेतला डुप्लेक्स फ्लॅट, महिन्याचं भाडं ऐकून थक्क व्हाल

सलमान खानने मुंबईत भाड्यानं घेतला डुप्लेक्स फ्लॅट, महिन्याचं भाडं ऐकून थक्क व्हाल

googlenewsNext
ठळक मुद्देसलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या तो बिग बॉस 15 होस्ट करतोय. लवकरच त्याचा ‘अंतिम- द फायनल ट्रूथ’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. महेश मांजरेकरचं दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 26 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) गेल्या अनेक वर्षांपासून वांद्रे भागातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये (Galaxy Apartment) राहतोय. याचा अर्थ सलमानकडे मुंबईत प्रॉपटर्ह नाही, असं मात्र मुळीच नाही. मुंबईत अनेक ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टी आहेत. आता मात्र सलमानने एक डुप्लेक्स फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. आता कोट्यवधी रूपयांचा मालक असलेल्या सलमानला घर भाड्यानं घेण्याची गरज का पडावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सलमान गॅलेक्सीतून शिफ्ट होतोय का? असा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल. पण तसंल काहीही नाही. सलमान गॅलेक्सी सोडून कुठेही जाणारा नाही. तूर्तास राहण्यासाठी नाही तर एका कामासाठी त्याने हा डुप्लेक्स फ्लॅट भाड्यानं घेतला आहे.

एका रिअल इस्टेट पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खान वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने वांद्रे येथील मकबा हाइट्स येथे 17 व्या आणि  18 व्या माळ्यावर हा डुप्लेक्स फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. याचे भाडे करारपत्रही समोर आलं आहे. काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांचा हा फ्लॅट आहे. सलमान खान सिद्दिकी कुटुंबामध्ये जवळचे संबंध आहेत. अनेकदा खान कुटुंबीय आणि सिद्दिकी कुटुंबीय एकमेकांच्या पार्ट्यांना हजेरी लावताना दिसतात.
 आता या फ्लॅटचं भाडं किती तर लाखांच्या घरात. होय, या फ्लॅटसाठी सलमान महिन्याकाठी 8 लाख 25 हजार रूपये भाडं मोजणार आहे.
  रिअल इस्टेट पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, 2 हजार 265 चौरस फूट कार्पेट एरिया असलेली ही मालमत्ता सलमान खानने 11 महिन्यांसाठी भाड्याने घेतली आहे. या ठिकाणी सलमान स्वत: राहणार नाही. या डुप्लेक्सचा वापर सलमान खानच्या कंपनीसाठी काम करणाºयाा लेखकांसाठी केला जाणार आहे. 

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या तो बिग बॉस 15 होस्ट करतोय. लवकरच त्याचा ‘अंतिम- द फायनल ट्रूथ’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. महेश मांजरेकरचं दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 26 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत त्याचा मेहुणा आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सलमान खान पोलिसाच्या भूमिकेत, तर आयुष गुंडाच्या भूमिकेत आहे.याशिवाय सलमान सध्या कॅटरिना कैफसोबत टायगर 3च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. कभी ईद कभी दिवाली , किक 2 या सिनेमातही तो झळणार आहे. शिवाय शाहरुख खानच्या ‘पठान’ या चित्रपटात तो कॅमियो करणार आहे.

Read in English

Web Title: Salman Khan Pays 8 Lakh 25 Thousand Rupees Monthly Rent For Duplex In Bandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.