Satish Kaushik : ‘तेरे नाम’च्या सेटवर चढला होता सलमानचा पारा, सतीश कौशिक यांच्यासोबत झाला होता मोठा वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 14:48 IST2023-03-09T14:46:14+5:302023-03-09T14:48:51+5:30
Salman Khan, Satish Kaushik : ‘तेरे नाम’च्या सेटवरच्या या घटनेची तेव्हा जोरदार चर्चा झाली होती.

Satish Kaushik : ‘तेरे नाम’च्या सेटवर चढला होता सलमानचा पारा, सतीश कौशिक यांच्यासोबत झाला होता मोठा वाद
अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक आता आपल्यात नाहीत. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सतीश कौशिकच्या निधनाने बाॅलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश यांनी अनेक चित्रपटांत अभिनय केला. अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलं. १९८३ साली रिलीज झालेल्या ‘मासूम’ या चित्रपटातून त्यांनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून डेब्यू केला होता. यानंतर ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत. यापैकी ‘तेरे नाम’ या सिनेमाच्या सेटवर सलमान व सतीश कौशिक यांच्यातील वादाच्या बातम्या त्यावेळी हेडलाईन्समध्ये होत्या.
होय, रिपोर्टनुसार ‘तेरे नाम’च्या सेटवर सलमान व सतीश यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. भांडणांचं कारण काय होतं, ते ठाऊक नाही. पण हा वाद प्रचंड विकोपाला गेला होता. त्यावेळी अनेक फिल्म्स मॅगझिन्स व दैनिकांनी ही घटना ठळकपणे छापली होती. अर्थात सतीश यांनी या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं होतं.
माझ्यात व सलमानमध्ये असा कुठलाही वाद झाला नव्हता. सलमान व माझे खूप चांगले संबंध आहेत. चांगले संबंध होते म्हणूनव ‘तेरे नाम’चं शूटींग केवळ ९० दिवसांत पूर्ण होऊ शकलं, असं ते म्हणाले होते. ‘तेरे नाम’ या चित्रपटाआधी सलमानचे एकापाठोपाठ एक सिनेमे फ्लॉप झाले होते. अशात सतीश कौशिक यांनी सलमानला ‘तेरे नाम’ ऑफर केला. या ट्रॅजिक रोमॅन्टिक कॉमेडीने सलमानची बुडती नौका सावरली. ‘तेरे नाम’ हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला.