सगळ्या कलाकारांना मागे टाकत स्टार रँकिंगमध्ये हा बॉलिवूड स्टार आहे एक नंबरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 06:00 AM2020-04-11T06:00:00+5:302020-04-11T06:00:03+5:30

या अभिनेत्याने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

salman khan is on number one as per ranking survey done by website PSC | सगळ्या कलाकारांना मागे टाकत स्टार रँकिंगमध्ये हा बॉलिवूड स्टार आहे एक नंबरवर

सगळ्या कलाकारांना मागे टाकत स्टार रँकिंगमध्ये हा बॉलिवूड स्टार आहे एक नंबरवर

googlenewsNext
ठळक मुद्देसलमानला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून छोट्या मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण त्याचे फॅन आहेत. एका लोकप्रिय पोर्टलने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, सलमान खान स्टार रँकिंग यादीत आपले हेच सर्वोच्च स्थान कायम ठेवून आहे.

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग म्हटले जाते. त्याने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडचा दिले असून तो प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सलमान खानचा चित्रपट म्हटला की, तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिकचा व्यवसाय करणार यात काहीच शंका नाही. त्यामुळेच सलमान खान भारतातल्या आघाडीच्या सुपरस्टार्सपैकी एक आहे.

सलमानला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून छोट्या मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण त्याचे फॅन आहेत. एका लोकप्रिय पोर्टलने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, सलमान खान स्टार रँकिंग यादीत आपले हेच सर्वोच्च स्थान कायम ठेवून आहे. हे रँकिंग फिल्म ओपनिंग आणि लोकप्रियतेच्या निकषाच्या मापदंडांवर मोजण्यात आले आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अभिनेता अक्षय कुमार असून सलमान खानच्या तुलनेत तो गुणांनी खूपच मागे आहे. अक्षय कुमार 887 गुणांवर असून सलमान 1718 गुणांवर आहे.

जेव्हा जगभरात सर्वात मोठ्या फॅन फॉलोइंगची गोष्ट येते तेव्हा सलमान खानची स्वत:ची एक लीग आहे. ज्यामध्ये सर्व वयोगटातील आणि क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होतो आणि त्यातही तरुणांमध्ये त्याची मोठी क्रेझ पाहायला मिळते.

याच कारणाने सलमान सर्वात प्रभावशाली सेलेब्सपैकी एक असून ब्रँड सर्किटमध्ये देखील एक प्रसिद्ध नाव आहे आणि नुकत्याच एका आघाडीच्या कोल्डड्रिंक्सच्या ब्रँडसाठी त्याला करारबद्ध करण्यात आले आहे.

Web Title: salman khan is on number one as per ranking survey done by website PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.