आता ‘या’ मित्राच्या मुलीला लॉन्च करतोय सलमान खान; ‘दबंग-३’मध्ये नव्या अभिनेत्रीची एंट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 20:59 IST2018-06-14T15:29:38+5:302018-06-14T20:59:38+5:30
सुपरस्टार सलमान खानने अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत रोमान्स केला आहे. ...

आता ‘या’ मित्राच्या मुलीला लॉन्च करतोय सलमान खान; ‘दबंग-३’मध्ये नव्या अभिनेत्रीची एंट्री!
स परस्टार सलमान खानने अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत रोमान्स केला आहे. २०१० मध्ये सोनाक्षीने सलमानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. आता आठ वर्षांनंतर सलमान पुन्हा एकदा असेच काहीसे करताना दिसणार आहे. होय, सलमान आणखी एका न्यू कमरसाठी गॉडफादर बनणार आहे. फिल्मफेअर रिपोर्टनुसार, ‘दबंग-३’मधून सलमान खान त्याचा मित्र महेश मांजरेकरची मुलगी अश्वामी मांजरेकर हिला लॉन्च करणार आहे. निर्मात्यांना सोनाक्षीसोबत या हिट सीरिजमध्ये आणखी एक अभिनेत्री हवी आहे. सुरुवातीला अशा बातम्या समोर आल्या होत्या की, सलमान या चित्रपटात मौनी रॉयला ब्रेक देणार आहे. परंतु एका मुलाखतीत मौनीने स्पष्ट केले होते की, ती ‘दबंग-३’मध्ये नसणार आहे. लेटेस्ट अपडेटनुसार, अश्वामी या चित्रपटाचा भाग बनणार आहे.
![]()
दरम्यान, ही बाब फारच कमी लोकांना माहिती आहे की, महेश आणि सलमान एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. अशात जेव्हा सलमानला कळाले की, महेशची मुलगी बॉलिवूडमध्ये काम करू इच्छिते तेव्हा त्याने लगेचच तिला ‘दबंग-३’मध्ये भूमिका देण्याविषयी योजना आखली आहे. मात्र ती कोणत्या भूमिकेत असेल? याविषयी अद्यापपर्यंत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. परंतु ज्या पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत, त्यावरून सोनाक्षीच्या बरोबरीचीच अश्वामीचीही भूमिका असणार आहे.
![]()
![]()
![]()
दरम्यान, महेश आणि दीपा मांजरेकरची अश्वामी मुलगी असून, तिला एक भाऊ आहे. त्याचे नाव सत्या असे आहे. महेशने दुसरे लग्न मेधा मांजरेकरशी केले आहे. दुसºया पत्नीपासून त्याला सई नावाची मुलगी आहे. अश्वामीचा जन्म २९ आॅगस्ट १९८८ मध्ये झाला असून, ती सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह आहे. अश्वामीने स्वत:चे प्रॉडक्शन हाउस सुरू केले असून, त्याचे नाव अश्वामी फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड असे आहे.