सलमान खान 'या' अभिनेत्रीकडे नाहीयेत उपचारासाठी पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 12:02 IST2018-03-19T06:32:44+5:302018-03-19T12:02:44+5:30

बॉलिवूडची दुनिया जितकी झगमगती वाटते तितकाच जवळून काळोख असतो. जोपर्यंत तुम्ही टीव्हीवर दिसत असता तो पर्यंतच लोक तुम्हाला विचारतात. ...

Salman Khan 'is not with the actress, money for the treatment | सलमान खान 'या' अभिनेत्रीकडे नाहीयेत उपचारासाठी पैसे

सलमान खान 'या' अभिनेत्रीकडे नाहीयेत उपचारासाठी पैसे

लिवूडची दुनिया जितकी झगमगती वाटते तितकाच जवळून काळोख असतो. जोपर्यंत तुम्ही टीव्हीवर दिसत असता तो पर्यंतच लोक तुम्हाला विचारतात. ज्यादिवशी तुमच्याकडेच फेम निघून जाते तुमची तुम्हाला कोणीच ओळखत नाही. असाच काहीसे घडले आहे सलमान खानच्या वीरगती चित्रपटातील अभिनेत्रीसोबत. अभिनेत्री पूजा डडवाल सध्या टीबीशी आणि फुप्फुसांच्या आजाराशी लढते आहे. पूजाची आर्थिक स्थिती बेताची आहे त्यामुळे तिच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नाही आहेत. गेल्या 15 दिवसांपासून मुंबईतल्या शिवडीमधल्या रुग्णालयात ती दाखल आहे.  

नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पूजाने सांगितले की, मला सहा महिन्यांपूर्वी कळले की मला टीबीसारखा गंभीर आजार झाला आहे. मी सलमान खासशी संपर्क केला पण अजून पर्यंत तो होऊ शकलेला नाही. गेल्या अनेक वर्षात मी गोव्यातल्या एक कसीनोमध्ये मॅनेजरचे काम करते. माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत. पूजाच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले तिच्या या आजारपणामुळे तिचा नवऱ्याने आणि कुटुंबीयांनी तिची साथ सोडून दिली आहे. योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिची परिस्थिती दिवसांदिवस वाईट होत चालली आहे. ती कमजोर होत चालली आहे. पूजाने वीरगती शिवाय हिंदुस्तान आणि सिंदूर की सौगंध सारख्या चित्रपटात काम केले आहे. सलमानच्या अभिनेत्री ही हाक आशा करुया सलमान पर्यंत पोहोचले आणि तो मदतीचा हात देईल. सलमान खान सध्या 'रेस3'  शूटिंगला सुरु केली आहे. यात सलमानसह  जॅकलिन फर्नांडिस, डेजी शहा आणि बॉबी देओल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  या चित्रपटाची निर्मिती रमेश तौराणी करतायेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुझा करतो आहे. यानंतर सलमान 'दबंग3'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 

Web Title: Salman Khan 'is not with the actress, money for the treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.