Salman Khan Net Worth: मुंबईपासून ते दुबईपर्यंत आहे सलमान खानची प्रॉपर्टी, तब्बल 3000 कोटींच्या संपत्तीचा आहे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 12:33 PM2022-05-05T12:33:50+5:302022-05-05T12:43:59+5:30

सलमान आज फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या स्टार्समध्ये गणला जातो. पनवेलमध्ये ही त्याचे 150 एकरच्या जागेत पसरलेले विस्तीर्ण फार्म हाऊस आहे.

salman khan net worth property and other details | Salman Khan Net Worth: मुंबईपासून ते दुबईपर्यंत आहे सलमान खानची प्रॉपर्टी, तब्बल 3000 कोटींच्या संपत्तीचा आहे मालक

Salman Khan Net Worth: मुंबईपासून ते दुबईपर्यंत आहे सलमान खानची प्रॉपर्टी, तब्बल 3000 कोटींच्या संपत्तीचा आहे मालक

googlenewsNext

बॉलिवूडमधील सुपरस्टारपैकी एक असलेल्या सलमान खान (Salman Khan)ने चित्रपटसृष्टीत ३३ वर्षे पूर्ण केली आहेत. 'मैने प्यार किया' या चित्रपटातून सलमान खानने नायक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चाहत्यांमध्ये भाईजानच्या नावाने प्रसिद्ध असलेला सलमान आज फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या स्टार्समध्ये गणला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान 3000 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला सलमान खानसोबत असलेल्या त्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत आज कोट्यवधीमध्ये आहे.

या यादीत पहिला क्रमांक या अभिनेत्याच्या घराचा आहे, ज्याला मुंबईचे 'लँडमार्क' म्हटंले जाते.. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान त्याच्या कुटुंबासोबत मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. हे तीन मजली अपार्टमेंट आहे ज्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे.

गॅलेक्सी अपार्टमेंट ही केवळ सलमान खानची मालमत्ता नाही. या अभिनेत्याचे महाराष्ट्रातील पनवेल येथे 150 एकरमध्ये पसरलेले विस्तीर्ण फार्म हाऊस देखील आहे.  या फार्म हाऊसमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. 

एवढेच नाही तर सलमान खानची दुबईत एक आलिशान मालमत्ताही आहे. ही मालमत्ता दुबईच्या सर्वात पॉश एरिया, द अॅड्रेस डाउनटाउन, बुर्ज खलिफा जवळ आहे. रिपोर्टनुसार या मालमत्तेची किंमतही कोट्यवधींच्या घरात आहे. सलमान खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्यात 'टायगर 3' आणि 'कभी ईद कभी दिवाळी'चा समावेश आहे.
 

Web Title: salman khan net worth property and other details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.