VIDEO: रितेश भाऊंवर भाईजानचं प्रेम; सलमानने स्वत:च्या हाताने बनवून दिली भेळ, जिनिलियाने शेअर केला खास व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:44 IST2025-12-29T17:43:21+5:302025-12-29T17:44:03+5:30
Salman Khan Bhel Puri Video: जिनिलिया देशमुखने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान स्वत: भेळ बनवत असल्याचं दिसत आहे.

VIDEO: रितेश भाऊंवर भाईजानचं प्रेम; सलमानने स्वत:च्या हाताने बनवून दिली भेळ, जिनिलियाने शेअर केला खास व्हिडीओ
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने त्याचा ६०वा वाढदिवस नुकताच साजरा केला. सलमानने पनवेलच्या फार्महाऊसवर वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं. त्याच्या वाढदिवसाला बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित होते. मराठमोळं कपल रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखनेही भाईजानच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. या बर्थडे पार्टीतील एक खास व्हिडीओ समोर आला आहे.
जिनिलिया देशमुखने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान स्वत: भेळ बनवत असल्याचं दिसत आहे. तर रितेश त्याच्या समोर उभा आहे. भाईजानने दिलेली भेळ पाहून रितेश म्हणतो, "भाऊंची भेळ". हा व्हिडीओ पाहून चाहतेही थक्क झाले आहे. "सलमान भाऊसारखं कोणीच नाही. तुम्हाला स्पेशल फील करवून देण्यासाठी तो काहीही करू शकतो. यावेळी त्याने खूपच चविष्ट भाऊंची भेळ बनवली. आमच्याकडून खूप प्रेम", असं जिनिलियाने व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे.
रितेश देशमुख आणि सलमान खान यांच्यात चांगली मैत्री आहे. रितेश देशमुखच्या सिनेमांमध्ये सलमानचा कॅमिओ असतोच असतो. सलमान खानने होस्ट केलेल्या बिग बॉस १९मध्येही रितेश देशमुख आगामी बिग बॉस मराठी ६ची घोषणा करण्यासाठी गेला होता. सलमान, रितेश आणि जिनिलिया यांच्यातील मैत्री चाहत्यांनाही आवडते.