सलमान खानला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:06 IST2016-01-16T01:18:59+5:302016-02-06T12:06:49+5:30

अभिनेता सलमान खानचे चाहते हजारोंच्या संख्येने आहेत. त्यांच्याशी हस्तांदोलन करून मैत्रीभावना जपणार्‍या सलमान खानला बांद्रा येथील एका नाईट क्लबमध्ये ...

Salman Khan looted | सलमान खानला लुटले

सलमान खानला लुटले

िनेता सलमान खानचे चाहते हजारोंच्या संख्येने आहेत. त्यांच्याशी हस्तांदोलन करून मैत्रीभावना जपणार्‍या सलमान खानला बांद्रा येथील एका नाईट क्लबमध्ये सलमानच्या फॅन असलेल्या चार मुलींनीच लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. गार्ड असतानाही असे घडलेच कसे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण हो हे खरं आहे. सलमानचे बॉडीगार्ड सोबत असतानाही त्याच्या चाहत्यांनी सलमानभोवती गराडा घालून त्यांच्याशी गप्पागोष्टी, हस्तांदोलन करत करतच सलमानला 'चुना' लावला आहे. या मुलींचा असा दावा होता की, त्या सलमानच्या खूप मोठय़ा फॅन आहेत. सलमानभोवतीचा चाहत्यांचा गराडा कमी झाल्यानंतर सलमानला लुटल्याचे लक्षात आले. त्याचे पाकीट, गॉगल आणि बजरंगी भाईजानचा पेडंट गायब असल्याचे त्याला नंतर समजले. त्या वेळी त्याच्या बॉडीगार्डनी पोलिसांत तक्रार देण्यास सुचविले मात्र, सलमानने तसे करण्यास नकार देऊन आपली सुरक्षा सुधारण्याची ताकीद गार्डना दिल्याचे समजते.

Web Title: Salman Khan looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.