गरजू लोकांच्या मदतीसाठी भाईजानने शोधला नवा पर्याय, वाचून तुम्हीही कराल सलमानचे कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 19:23 IST2020-05-08T19:23:27+5:302020-05-08T19:23:59+5:30

सध्या सलमानच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होतंय.

Salman Khan Launches His Food Truck Being Haangryy For Needy Amid Lockdown TJL | गरजू लोकांच्या मदतीसाठी भाईजानने शोधला नवा पर्याय, वाचून तुम्हीही कराल सलमानचे कौतूक

गरजू लोकांच्या मदतीसाठी भाईजानने शोधला नवा पर्याय, वाचून तुम्हीही कराल सलमानचे कौतूक


बॉलिवूडचा दबंग खान सलमान कोरोना व्हायरसमुळे सुरू केलेल्या लॉकडाउनच्या सुरूवातीपासूनच लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. काही दिवसांपूर्वी सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. या व्हिडिओत तो पनवेलच्या फार्महाऊसवर कुटुंबातील सदस्यांसोबत बैलगाडी व टेम्पोमध्ये किराणा सामान भरताना दिसत होते. आता पुन्हा एकदा सलमान लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. यावेळेस त्याने नवीन फंडा आजमवला आहे. 

लॉकडाऊनच्या काळात हजारोंच्या संख्येत मजूर पायी अनेक किलो मीटरचा प्रवास करत आहेत. अशा मजुरांच्या मदतीसाठी सलमान खान धावून आला आहे. सलमान खानची बिइंग ह्युमन ही सामाजिक संस्था असून या संस्थेमार्फत तो समाजसेवा करत असतो. पण आता त्याने बिइंग हंगरी नावाचा एक ट्रक सुरू केला आहे.

सोशल मीडियावर सलमान खानच्या एका चाहत्याने ट्विट करून ही माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये मजुरांसाठी धान्य देतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.


शिवसेनेचे युवानेता राहुल कनाल यांनी फूड व्हॅनचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याने या ट्विटमध्ये सलमान खानचे आभार मानले आहेत. धन्यवाद, सलमान भाई अगदी शांतपणे असे काही केल्याबद्दल.सलमानच्या अधिकृत अकाऊंटवरून अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.

सलमान खानने बॉलिवूडमधील जवळपास 25 हजार दैनंदिन वेतनावर काम करणाऱ्या कामगार व गरीबांची मदत करत आहेत. त्यांना आर्थिक मदतीसोबतच गरजेचं सामानदेखील देत आहे. याशिवाय ऑल इंडिया स्पेशल आर्टिस्ट्स एसोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या 45 कलाकारांच्या बँक अकाउंटमध्ये तीन-तीन हजार रुपये जमा केले आहे. या सर्वांनी त्याचे आभार मानले आहेत.

Web Title: Salman Khan Launches His Food Truck Being Haangryy For Needy Amid Lockdown TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.