"शाहरुख 'जेंटलमॅन' तर 'बॅड बॉय' सलमान", अर्शद वारसी सुपरस्टार्सची तुलना करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 09:08 IST2025-12-29T09:06:21+5:302025-12-29T09:08:25+5:30
अर्शद वारसीने शाहरुख खान आणि सलमान खान यांची तुलना करत त्यांच्याबद्दल अतिशय रंजक खुलासे केले आहेत.

"शाहरुख 'जेंटलमॅन' तर 'बॅड बॉय' सलमान", अर्शद वारसी सुपरस्टार्सची तुलना करत म्हणाला...
Arshad Warsi Shahrukh Khan Salman Khan Comparison : बॉलिवूडचा 'सर्किट' अर्थात अर्शद वारसीने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'गोलमाल', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'धमाल', 'जॉली एलएलबी' यांसारख्या हिट कॉमेडी फ्रँचायझींमध्ये अर्शद वारसीचे मोठे योगदान आहे. त्याच्या 'कॉमिक टाइमिंग'चे सगळेच चाहते आहेत. गेल्या २५ वर्षांपासून अर्शद बॉलिवूडचा भाग आहे. या काळात त्याने अनेक मोठे चित्रपट निर्माते आणि स्टार्ससोबत काम केले आहे. अलीकडेच एका मुलाखतीत अर्शदने शाहरुख खान आणि सलमान खान यांच्याबद्दल अतिशय रंजक खुलासे केले आहेत.
अर्शदने सलमान आणि शाहरुखच्या व्यक्तिमत्त्वातील फरक सांगितला. त्यानं शाहरुखचा 'जेंटलमॅन' तर सलमान 'बॅड बॉय' असा उल्लेख केला. शाहरुख आणि सलमानची तुलना करताना अर्शद म्हणाला, "शाहरुख खान हा खऱ्या अर्थाने एक जेंटलमॅन आहे. तो अतिशय शांत, नम्र आणि सहकलाकारांना पाठिंबा देणारा अभिनेता आहे. त्याला जुन्या काळातील रंगभूमीची शिस्त आहे. याउलट सलमान खानमध्ये एक 'बॅड बॉय' आहे. तो देखणा आहे आणि त्याच्यात एक बंडखोरपणा जाणवतो".
मात्र, सलमानच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगताना अर्शदने स्पष्ट केले की, "कॅमेऱ्यासमोर सलमान जरी 'बॅड बॉय' वाटत असला, तरी घरी तो तसा नाही. तो आणि त्याचे संपूर्ण कुटुंब खूप मजेशीर आहे. त्यांना विनोदाची उत्तम जाण असून ते खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेतात".
दरम्यान, अर्शद वारसीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच शाहरुख खानसोबत आगामी 'किंग' या चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी त्यांनी 'कुछ मीठा हो जाये' मध्ये एकत्र काम केले होते. तर तो शेवटचा 'जॉली एलएलबी ३' चित्रपटात पाहायला मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केला. हा त्याच्या हिट चित्रपट 'जॉली एलएलबी'चा सीक्वल होता.