वयाची पन्नाशी ओलांडलेल्या सलमान खानचा हा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 12:41 PM2019-06-23T12:41:14+5:302019-06-23T12:41:47+5:30

सलमान खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटाची  क्रेझ पाहायला मिळतेय. पण तूर्तास आम्ही सलमानच्या या चित्रपटाबद्दल नाही तर त्याच्या एका व्हिडीओबद्दल सांगणार आहोत.

salman khan instagram video getting viral on social media |  वयाची पन्नाशी ओलांडलेल्या सलमान खानचा हा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क!

 वयाची पन्नाशी ओलांडलेल्या सलमान खानचा हा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क!

googlenewsNext
ठळक मुद्दे  सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘दबंग ३’च्या चित्रीकरणात बिझी आहे.

सलमान खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटाची  क्रेझ पाहायला मिळतेय. पण तूर्तास आम्ही सलमानच्या या चित्रपटाबद्दल नाही तर त्याच्या एका व्हिडीओबद्दल सांगणार आहोत. सध्या भाईजान ‘दबंग 3’मध्ये बिझी आहे. याशिवाय ‘बिग बॉस 13’चीही तयारी करतोय. पण इतक्या बिझी शेड्यूलमध्येही सलमान सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वत:चे फिटनेस व्हिडीओ शेअर करण्याचा धडाका त्याने लावला आहे. ताजा व्हिडीओही असाच. या व्हिडीओत सलमान पाण्यामध्ये रिव्हर्स ड्राइव्ह मारताना दिसतोय.


सलमानने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओत सलमान स्वीमिंगपूलमध्ये बॅक फ्लिप मारताना दिसत आहे.  चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड भावला असून अनेकांनी त्याच्यावर कमेंट केल्या आहेत. ५३ वर्षांच्या सलमानचा फिटनेस पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.


काही दिवसांपूर्वी त्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात सलमान घोड्यासोबत स्पर्धा करताना दिसला होता. सलमान घोड्यासोबत धावतो आणि शेवटी घोड्याच्या आधी पोहोचतो, असा हा व्हिडीओ होता. हा व्हिडीओही लोकांना आवडला होता.


  सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘दबंग ३’ च्या चित्रीकरणात बिझी आहे. या चित्रपटात सलमानसह अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर सलमान संजय लीला भन्साली यांच्या ‘ईन्शाल्ला’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे.

Web Title: salman khan instagram video getting viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.