सलमान खानने पुन्हा दाखवली दिलदारी, दबंग 3च्या या सहकलाकाराला आजारपणात केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 12:52 IST2019-07-05T12:44:54+5:302019-07-05T12:52:45+5:30
या अभिनेत्याने सलमान खानसोबत दबंग आणि दबंग 2 मध्ये काम केले आहे.

सलमान खानने पुन्हा दाखवली दिलदारी, दबंग 3च्या या सहकलाकाराला आजारपणात केली मदत
सलमान खानला बॉलिवुडचा दबंग खान म्हटले जाते. त्याने गेल्या काही वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीला दिले आहेत. सलमानचा भारत हा चित्रपट काही आठवड्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. सलमान एक खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच तो खूप चांगला माणूस देखील आहे. तो नेहमीच लोकांना मदत करण्यात तत्पर असतो. सलमान खान दिलदार असल्याचे त्याने आता पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
सलमान सध्या दबंग 3 या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना त्याला समजले की, या चित्रपटातील त्याचे सहकलाकार दद्दी पांडेला हृदयविकाराचा झटका आला असून तो रुग्णालयात दाखल आहेत. सलमानला हे कळताच त्याने लगेचच त्याच्या टीममधील काही व्यक्तींना दद्दी पांडेच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पाठवले.
दद्दी पांडेने सलमान खानसोबत दबंग आणि दबंग 2 मध्ये काम केले आहे. सलमानने लगेचच दद्दी पांडेला गोरेगावात मधील एका चांगल्या रुग्णायलात दाखल केले.
‘दबंग 3’ या चित्रपटात सलमान पुन्हा एकदा इन्स्पेक्टर चुलबुल पांडेच्या आयकॉनिक भूमिकेत दिसणार आहे. साहजिकच चुलबुल पांडेला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाचे मध्य प्रदेशमधील चित्रीकरण काही दिवसांपूर्वी संपले असून ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावरून दिली होती आणि तिथल्या सेटवरील फोटोदेखील शेअर केला होता. सलमानने मध्यप्रदेशमधील महेश्वर येथे १२ दिवस दबंग ३ चे चित्रीकरण केले. या चित्रीकरणावरून वादही निर्माण झाला होता. पण तरीही सलमान खानने महेश्वरमधील 'दबंग ३'चे चित्रीकरण पूर्ण केले.
दबंग 3 या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले ही बातमी मीडियात आल्यापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात होते. दबंग 3 कधी प्रदर्शित होणार याविषयी स्वतः सलमान खानने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सांगितले होते. सलमानने दबंग चित्रपटातील त्याचा फोटो पोस्ट करून 20 डिसेंबर 2019 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे सगळ्यांना सांगितले होते. या फोटोत त्याने पोलिसांची वर्दी घातली होती आणि त्यावर चुलबुल पांडे असे लिहिलेले होते.