सलमान खानला किमान दोन महिने कारागृहात राहावे लागण्याची शक्यता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 15:18 IST2018-04-05T09:44:08+5:302018-04-05T15:18:03+5:30

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरविताना पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

Salman Khan has to stay in jail for at least two months? | सलमान खानला किमान दोन महिने कारागृहात राहावे लागण्याची शक्यता?

सलमान खानला किमान दोन महिने कारागृहात राहावे लागण्याची शक्यता?

पूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल समोर आला असून, सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायालयाने शिक्षेचे फर्मान सोडताच त्याचे अटक वॉरंटही काढले. आता पोलीस सलमानची कारागृहात रवानगी करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, न्यायालयाचा निकाल पाहता सलमानला आता किमान दोन महिने कारागृहात राहावे लागेल शक्यता वर्तविली जात आहे. 

जर सलमानला या प्रकरणात दोन वर्षे किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा झाली असती तर कदाचित त्याला लगेचच जामिनासाठी अर्ज करता आला असता. परंतु शिक्षेचा कालावधी वाढल्याने त्याला कारागृहात काहीकाळ राहावे लागणार आहे. कारण जोधपूर न्यायालयाच्या निकालाला अपिलाच्या माध्यमातून आव्हान देण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण होऊ द्यावी लागणार असून, त्यास किती काळ लागेल याविषयी अनिश्चितता आहे. 

दरम्यान, सलमानकडून आता जिल्हा न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात अपील करण्याची तयारी करीत आहे. ही प्रक्रिया त्याला उद्यापासून करता येईल. सलमानकडून अपिलासाठी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या निकालाची मूळ प्रत प्राप्त करण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर निकालाची मूळ प्रत उच्च न्यायालयात पाठविली जाईल. उच्च न्यायालयाकडून राजस्थान सरकारला याबाबतची नोटीस बजावली जाईल. तसेच त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना तारीख दिली जाईल. त्यानंतर सलमानच्या अपिलावर सुनावणी होऊन त्याला कारागृहातून बाहेर पडता येईल. 

मात्र ही संपूर्ण प्रक्रिया याच महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. अन्यथा सलमानला आणखी एक महिना कारागृहात काढावा लागेल. कारण मे महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाला उन्हाळ्याच्या सुट्या लागणार. या सुट्यांच्या काळात अपिलावर सुनावणी केली जात नाही. अशात ही प्रक्रिया लांबल्यास त्याला संपूर्ण जून महिना कारागृहातच काढावा लागू शकतो. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात न्यायालय सुरू झाल्यानंतर पुन्हा नव्याने या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होईल. त्यामुळे आता सलमानला कारागृहातून बाहेर काढण्यासाठी येत्या काही दिवसांत काय धडपड केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

Web Title: Salman Khan has to stay in jail for at least two months?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.