रेस ३च्या निर्मात्यांशी सलमान खान या कारणावरुन भिडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 11:08 IST2017-11-13T05:38:46+5:302017-11-13T11:08:46+5:30
सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या 'रेस ३' चित्रपटाचे शूटिंग ९ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. यात चित्रपटात बॉबी देओल, ...

रेस ३च्या निर्मात्यांशी सलमान खान या कारणावरुन भिडला
स मान खानची मुख्य भूमिका असलेल्या 'रेस ३' चित्रपटाचे शूटिंग ९ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. यात चित्रपटात बॉबी देओल, डेजी शाह, जॅकलिन फर्नाडिस, सकीब सलीम, आदित्य पंचोली, पुजा हेगडे आणि फ्रेडी दारुवाला सुद्धा झळकणार आहे. या कलाकारांसह अऩिल कपूर ही या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा होती पण आता एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. अनिल कपूरला या चित्रपटात न घेतल्यामुळे सलमान खान निर्मात्यांवर नाराज झाला आहे. अनिल कपूरला या चित्रपटात न घेणे सलमान खानला अजिबात आवडलेले नाही. त्याने निर्मात्यांना स्पष्ट शब्दात स्क्रिप्टमध्ये बदल करायला सांगितले आहे. अनिल कपूरने या आधीच्या दोन्ही सीरिजमध्ये अऩिल कपूर झळकला होता. त्यामुळे 'रेस ३' मध्ये ही अनिल कपूरसाठी सलमान जागा तयार करायला सांगितली आहे. अनिल कपूरने रेसच्या सीरिजमध्ये आतापर्यंत रॉबर्ट डिस्कॉस्टा नावाची भूमिका साकारली आहे. जो एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असतो. अनिल कपूरने साकारलेली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
ह्या वेळेस सलमान आपल्या चाहत्यांना 'रेस३' हा चित्रपट ईदी म्हणून देणार आहे. २०१८च्या ईदला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच सलमानने 'रेस ३'च्या टीम बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.
ALSO READ : या अभिनेत्याची मुलं त्याला एके नावाने हाक मारतात
सध्या अनिल कपूर सध्या फन्ने खानच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अनिलने या चित्रपटासाठी वजनही कमी केले. यासाठी आपल्या डेली फिटनेस रूटीनमध्ये त्याला काही बदल करावे लागले. यानंतर भूमिकेसाठी लागणाºया शेपमध्ये यायला त्याला चार आठवडे लागले. अतुल मांजरेकर दिग्दर्शित ‘फन्ने खान’ या चित्रपटात अनिल कपूर व ऐश्वर्या राय ही जोडी तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहे. यापूर्वी ही जोडी ‘ताल’मध्ये एकत्र दिसली होती. तर राजकुमार राव ही या चित्रपटात दिसणार आहे. अनिल या चित्रपटात ‘सॉल्ट अॅण्ड पेपर’ लूकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.