सलमान खानला का वाटले, रणवीर सिंगच्या डोक्यात खुर्ची माराविशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 18:19 IST2017-08-24T12:49:20+5:302017-08-24T18:19:20+5:30
‘मला रणवीर सिंगच्या डोक्यावर खुर्ची तोडाविशी वाटते’ असे जर दबंग सलमान खानने म्हटले तर तुम्हाला कसे वाटेल? वाईट ना? ...

सलमान खानला का वाटले, रणवीर सिंगच्या डोक्यात खुर्ची माराविशी?
‘ ला रणवीर सिंगच्या डोक्यावर खुर्ची तोडाविशी वाटते’ असे जर दबंग सलमान खानने म्हटले तर तुम्हाला कसे वाटेल? वाईट ना? मात्र खरोखरच सलमान असा म्हटला होता. तेव्हा त्याला रणवीरला मारायचे होते. हा किस्सा २०१६ मधील आहे. ६ जुलै रोजी सलमानचा ‘सुलतान’ हा चित्रपट रिलीज झाला होता. यादरम्यान, रणवीर पॅरिसमध्ये होता. तो आदित्य चोपडाच्या ‘बेफिक्रे’ची शूटिंग करीत होता. यावेळी रणवीर सल्लूचा ‘सुलतान’ बघण्यासाठी गेला होता. इथपर्यंत सर्व काही ठीक होते.
मात्र चित्रपट बघताना रणवीर अचानकच ‘बेबी को बेस पसंद हैं’ या गाण्यावर नाचायला लागला. रणवीरला बघून त्याचे चाहतेही डान्स करायला लागले. अर्थातच रणवीरचा हा डान्स त्याकाळी चर्चेत राहिला. कारण त्याच्या स्टेप्स उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरल्या होत्या. पुढे रणवीरचा हा प्रताप सलमान खानपर्यंत पोहोचला. जेव्हा सलमानला रणवीरच्या या आगळ्या-वेगळ्या डान्सविषयी विचारले तेव्हा त्याने चेष्टामस्करीत म्हटले की, ‘मी त्याला जीवानिशी मारू इच्छितो, मला त्याच्या डोक्यात खुर्ची तोडायची होती. तो चित्रपट बघायला गेला होता की, डान्स करायला? मला असे वाटते की, लोकांनी त्याला बघावे यासाठीच त्याने हा उपद््व्याप केला असावा. आम्हाला याकरिता त्याच्याकडून पैसे घ्यायला हवेत.
असो, हा सर्व किस्सा चेष्टामस्करीत घडला होता. खरं तर रणवीर त्याच्या याच हटके अंदाजासाठी ओळखला जातो. तो कुठेही गेला तरी, त्याची छाप पाडण्याची तो एकही संधी सोडत नाही. अशात थिएटरमध्ये सल्लूभाईच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करण्याची तो संधी कशी सोडू शकेल? असो, सलमान आणि रणवीरमध्ये खूप चांगले नाते आहे. रणवीर सलमानचा खूप आदर करतो. सलमानही त्याच्यातील टॅलेंटमुळे प्रभावीत झालेला आहे.