सलमान खानची ही नायिका पन्नाशीतही दिसते अतिशय सुंदर, हा फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 15:47 IST2021-03-11T15:47:08+5:302021-03-11T15:47:56+5:30

या अभिनेत्रीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोत ती प्रचंड सुंदर दिसत आहे. ती आजही तितकीच सुंदर दिसत असे तिचे चाहते तिला कमेंटद्वारे सांगत आहेत. 

salman khan costar bhagyashree picture viral on social media | सलमान खानची ही नायिका पन्नाशीतही दिसते अतिशय सुंदर, हा फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

सलमान खानची ही नायिका पन्नाशीतही दिसते अतिशय सुंदर, हा फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

ठळक मुद्देभाग्यश्री आजही तितकीच सुंदर दिसत असे तिचे चाहते तिला कमेंटद्वारे सांगत आहेत.

मैंने प्यार किया या चित्रपटाद्वारे भाग्यश्रीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. भाग्यश्रीच्या सौंदर्याची त्या काळात चांगलीच चर्चा रंगली होती. आज भाग्यश्रीने वयाची पन्नाशी पार केली असली तरी ती आजही तितकीच सुंदर दिसते. एखाद्या तरुणीला लाजवेल असे तिचे सौंदर्य आहे. भाग्यश्रीच्या फिटनेसची देखील नेहमीच चर्चा सोशल मीडियावर रंगते.

भाग्यश्रीने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोत ती प्रचंड सुंदर दिसत आहे. भाग्यश्री आजही तितकीच सुंदर दिसत असे तिचे चाहते तिला कमेंटद्वारे सांगत आहेत. 

भाग्यश्री ही एक मराठी मुलगी असून तिचे नाव भाग्यश्री पटवर्धन आहे. भाग्यश्रीचा जन्म सांगलीतील राजघराण्यात झाला असून तीन बहिणींमध्ये भाग्यश्री सगळ्यात मोठी आहे. मैंने प्यार किया या चित्रपटामुळे भाग्यश्री रातोरात स्टार बनली. ‘मैंने प्यार किया’ नंतर भाग्यश्रीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास लोक उत्सुक होते. पण पहिल्याच चित्रपटानंतर भाग्यश्री बॉलिवूडमधून दिसेनासी झाली. खरे तर ‘मैंने प्यार किया’नंतर भाग्यश्रीकडे खूप मोठ मोठ्या ऑफर्स आल्या. पण भाग्यश्रीने त्या सगळ्या धुडकावून लावल्या आणि हिमालय दसानीसोबत ती लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर तिने हिमालयसोबत काही चित्रपट केले. पण या चित्रपटांना प्रेक्षकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.

भाग्यश्रीने काही वर्षांपूर्वी लौट आओ त्रिशा या मालिकेत काम केले होते. आता ती ‘सीताराम कल्याण’ या कन्नड चित्रपटात झळकणार आहे. यानंतर ती ‘किट्टी पार्टी’ शिवाय ‘2 स्टेट्स’च्या तेलगू रिमेकमध्ये दिसणार आहे. इतकेच नाही तर प्रभाससोबतही एक सिनेमा तिने साईन केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘प्रभास 20’ असल्याचे कळतेय. याशिवाय एका हिंदी सिनेमातही तिची वर्णी लागली आहे.

Web Title: salman khan costar bhagyashree picture viral on social media