गीतकार बनला सलमान खान! ‘रेस3’साठी लिहिले रोमॅन्टिक गाणे!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 12:00 IST2018-03-16T08:21:51+5:302018-03-19T12:00:48+5:30
सलमान खानचा अभिनय तुम्ही पाहिलायं, त्याचे गाणे ही ऐकलेय. पण याशिवायही सलमानकडे एक गुण आहे. तो कुठला? तर सलमान ...

गीतकार बनला सलमान खान! ‘रेस3’साठी लिहिले रोमॅन्टिक गाणे!!
स मान खानचा अभिनय तुम्ही पाहिलायं, त्याचे गाणे ही ऐकलेय. पण याशिवायही सलमानकडे एक गुण आहे. तो कुठला? तर सलमान एक गीतकारही आहे. होय, आता अभिनेता, गायक आणि गीतकार अशी सलमानची ओळख असणार आहे. आपल्या आगामी ‘रेस3’ या चित्रपटासाठी सलमानने एक रोमॅन्टिक गाणे लिहिले आहे. सलमानने हे गाणे आपल्या टीमला ऐकवले आणि ते सगळ्यांनाच आवडले. हेच गाणे ‘रेस3’मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोबतच पहिल्यांदा क्रेडिट्समध्ये ‘लिरिसिस्ट’ म्हणून सलमान खानचे नावही झळकणार आहे. ‘रेस3’चे निर्माते रमेश तौरानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सलमानने लिहिलेले गाणे अतिशय सुंदर आहे. अगदी आम्हाला हवे होते तसेच रोमॅन्टिक, असे ते म्हणाले.
सलमानने शब्दबद्ध केलेल्या या गीताला विशाल मिश्राने संगीत दिले आहे. सलमानवर चित्रीत करण्यात येणारे हे गाणे रेमो डिसूजा कोरिओग्राफ करणार आहे. तूर्तास अबूधाबी येथे या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. या चित्रपटात सलमानशिवाय जॅकलिन फर्नांडिस,बॉबी देओल, साकिब सलीम, डेजी शाह मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा कॅमिओ रोलमध्ये असेल.‘रेस3’मध्ये सलमान पहिल्यांदा निगेटीव्ह कॅरेक्टरमध्ये दिसेल. त्यामुळे सलमानचे चाहते प्रचंड उत्सूक आहेत. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
ALSO READ : सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शिरली चाहती! आत्महत्येची धमकी देत तासभर घातला धिंगाणा!
‘रेस’ आणि ‘रेस2’ हे दोन्ही पार्ट आपण बघितले आहेत. ‘रेस3’ हा या फ्रेंचाइजीपेक्षा वेगळा असल्याचा दावा केला जात आहे. रमेश तौरानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात अॅक्शन व सन्पेन्स तर आहेच. पण एक आगळीवेगळी कथा यात पाहायला मिळणार आहेत.