​सलमान खानला व्हायचेयं ‘बाप’; बनणार का ‘सिंगल पॅरेंट’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 13:54 IST2017-07-31T08:24:50+5:302017-07-31T13:54:50+5:30

बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ कोण? असा प्रश्न केल्यावर एकच उत्तर मिळते. ते म्हणजे बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमान खान. ...

Salman Khan to be 'father'; Becoming a 'Single Parenting'? | ​सलमान खानला व्हायचेयं ‘बाप’; बनणार का ‘सिंगल पॅरेंट’?

​सलमान खानला व्हायचेयं ‘बाप’; बनणार का ‘सिंगल पॅरेंट’?

लिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ कोण? असा प्रश्न केल्यावर एकच उत्तर मिळते. ते म्हणजे बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमान खान. सलमानचे दोनाचे चार हात कधी होणार? या प्रश्नाने चाहते अस्वस्थ असताना सलमानच्या डोक्यात मात्र वेगळेच काही सुरु आहे. होय, सलमान लग्न कधी करणार? कुणाशी करणार? हे तर कुणालाच ठाऊक नाही. स्वत: सलमानही यावर काहीही बोलायला तयार नाही. पण एक गोष्ट मात्र सलमानने स्पष्ट केली आहे. होय, ती म्हणजे, त्याला लवकरात लवकर बाप व्हायचेय.
एका लोकप्रीय मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सलमानने आपल्या मनीची ही इच्छा बोलून दाखवली. मला लवकर मुलं हवे आहे. वेळ वेगाने निघून जातोस, असे मला वाटत नाही. मला फक्त एवढेच ठाऊक आहे की, मी ७० वर्षांचा असेल तेव्हा माझा २० वर्षांचा मुलगा असेल. मला येत्या काळात किंवा येत्या दोन-तीन वर्षांत मुलं हवे आहे. याचे कारण केवळ एकच आहे. ते म्हणजे, माझ्या आई-बाबांना माझे मुलं पाहता यावे, असे सलमान यावेळी म्हणाला.
यापूर्वीही बाप होण्याची इच्छा सलमानने व्यक्त केली होती. लग्नाचे तर माहित नाही. पण दोन-तीन मुलं व्हावीत, अशी माझी इच्छा आहे. लग्नाशिवाय मुलं कशी होतील, हे मला ठाऊक नाही. पण मी मॅनेज करेल, असे तो म्हणाला होता. हीच इच्छा सलमानने आता वेगळ्या शब्दांत बोलून दाखवली आहे. तसेही सध्या बॉलिवूडमध्ये सिंगल पॅरेंट बनण्याची क्रेझ वाढते आहे. तुषार कपूर व करण जोहर ही या शृंखलेतील ताजी नावे आहेत. आता या शृंखलेत लवकरच सलमानचे नाव आले तर आश्चर्य वाटायला नको.

Web Title: Salman Khan to be 'father'; Becoming a 'Single Parenting'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.