अखेर वाद मिटला! अरजित सिंगने गायलं सलमानसाठी गाणं, 'टायगर ३'मधील गाण्याचं पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 04:22 PM2023-10-19T16:22:36+5:302023-10-19T16:25:24+5:30

आज सलमानने पहिल्यांदा अरिजित सिंगसोबत गाण्याची घोषणा केली आहे.

salman khan announces tiger 3 first song with arijit singh extending friendship katrina kaif know details | अखेर वाद मिटला! अरजित सिंगने गायलं सलमानसाठी गाणं, 'टायगर ३'मधील गाण्याचं पोस्टर आऊट

अखेर वाद मिटला! अरजित सिंगने गायलं सलमानसाठी गाणं, 'टायगर ३'मधील गाण्याचं पोस्टर आऊट

सलमान खानचा (Salman Khan) आगामी 'टायगर 3' (Tiger 3) चा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज झाला आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर टायगर ३ रिलीज होतोय. पहिल्या दोन्ही सिनेमांचं ब्लॉकबस्टर यश पाहता तिसऱ्या भागाकडूनही चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. 'टायगर 3'चा प्रोमो आणि पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. आता सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. आज सलमानने पहिल्यांदा अरिजित सिंगसोबत गाण्याची घोषणा केली आहे. हे गाणे सलमान आणि कतरिना कैफच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'टायगर 3' मधलं आहे. यासोबतच सलमानने त्याच्या नवीन गाण्याचा फर्स्ट लूकही शेअर केला आहे.

सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'टायगर 3' चित्रपटाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सलमान आणि कतरिनाच्या गाण्याचा फर्स्ट लूकही आहे. सलमान खान काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसत आहे आणि कतरिना कैफने लाल आणि पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट्समध्ये दिसतेय. हे गाणे शेअर करताना सलमान खानने अरिजित सिंगला टॅग केले आहे. म्हणजे बऱ्याच दिवसांनी अरिजित सिंगचा आवाज सलमानच्या चित्रपटात ऐकायला मिळणार आहे. 


हा फर्स्ट लूक शेअर करताना सलमानने लिहिले - 'पहिल्या गाण्याची पहिली झलक #LekePrabhuKaNaam!, माझ्यासाठी अरिजित सिंगचे पहिले गाणे आहे'. हे गाणे २३ ऑक्टोबरला रिलीज होणार असल्याचे सलमान खानने सांगितले आहे. सलमानच्या हॅशटॅगनुसार या गाण्याचे बोल 'लेके प्रभु का नाम' ने सुरू होतील.

१२ ऑक्टोबर दिवाळीच्या दिवशीच सिनेमा प्रदर्शित होतोय. त्या दिवशी रविवारही आहे. त्यामुळे या सुट्ट्यांचा सिनेमाला फायदा होणार यात शंका नाही. सिनेमा हिंदी, तेलुगू आणि तमिळ या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. 
 

Web Title: salman khan announces tiger 3 first song with arijit singh extending friendship katrina kaif know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.