​सलमान खान आणि सुरज बडजात्या यांच्या जोडीचा चित्रपट लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 16:24 IST2017-02-25T10:54:39+5:302017-02-25T16:24:39+5:30

सलमान खानने बिवी होतो ऐसी या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने साहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. ...

Salman Khan and Suraj Barjatya pair soon | ​सलमान खान आणि सुरज बडजात्या यांच्या जोडीचा चित्रपट लवकरच

​सलमान खान आणि सुरज बडजात्या यांच्या जोडीचा चित्रपट लवकरच

मान खानने बिवी होतो ऐसी या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने साहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर मैंने प्यार किया या चित्रपटाद्वारे एक नायक म्हणून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याच्या या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले. सुरज बडजात्याच्या राजश्री प्रोडक्शसोबत त्याचा हा पहिला चित्रपट होता. त्यानंतर सलमान आणि सुरजच्या जोडीने हम आपके है कौन, हम साथ साथ है, प्रेम रतन धन पायो यांसारखे हिट चित्रपट दिले. 
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या प्रेम रतन धन पायो या सलमान आणि सुरजच्या जोडीच्या चित्रपटाने तर 200 कोटीहूनही अधिक गल्ला जमवला. सलमान आणि सुरज यांच्या जोडीचा चित्रपट म्हटला की, तो बॉक्स ऑफिसवर हिटच ठरणार असे आता समीकरणच बनले आहे. 
सलमान आणि सुरज पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. सलमान आणि सुरज एका चित्रपटावर काम करत होते. पण काही कारणास्तव तो चित्रपट बनणार नसल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. पण या सगळ्या अफवा असल्याचे सुरज बडजात्याने स्वतः स्पष्ट केले आहे. तो लवकरच सलमानसोबत काम करणार असल्याचे त्याने नुकतेच म्हटले आहे. खरे तर सुरज सध्या त्याच्या कामात प्रचंड व्यग्र आहे. पण तरीही सलमानसोबत काम करण्यासाठी तो वेळ काढणार आहे. राजश्री प्रोडक्शनच्या लवकरच चार मालिका येणार असल्याने या मालिकांच्या निर्मितीसाठी त्याला अधिकाधिक वेळ द्यावा लागत आहे. पण या सगळ्यातून वेळ काढून तो सलमान सोबतच्या चित्रपटावर लवकरच काम करायला सुरुवात करणार असल्याचे कळतेय. 



Web Title: Salman Khan and Suraj Barjatya pair soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.