सलमान खान आणि कॅटरिना कैफ करताहेत ‘‘स्वॅग से स्वागत...’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 13:54 IST2017-11-21T08:23:25+5:302017-11-21T13:54:26+5:30
‘टायगर जिंदा है’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालायं आणि आता या चित्रपटाचे तेवढेच बहुप्रतिक्षीत गाणे ‘स्वॅग से स्वागत’ही आऊट झालेयं.
.jpg)
सलमान खान आणि कॅटरिना कैफ करताहेत ‘‘स्वॅग से स्वागत...’!!
स मान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपट रिलीज व्हायला अद्याप महिनाभराचा अवकाश आहे. पण त्यापूर्वी या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालायं आणि आता या चित्रपटाचे तेवढेच बहुप्रतिक्षीत गाणे ‘स्वॅग से स्वागत’ही आऊट झालेयं. हे गाणे ऐकल्यानंतर आज अख्खा दिवस तुमच्या ओठांवर हेच गाणे असणार, हे आम्ही दाव्यानिशी म्हणू शकतो.
सलमानने त्याच्या सोशल अकाऊंटवरून हे गाणे शेअर केलेयं. ‘स्वागत करो तो दिले से करो और स्वॅग से...’ असे त्याने लिहिलेयं. गाण्याचे म्हणाल या गाण्यात कॅटरिना कैफच्या अदा बघण्यासारख्या आहे. शेकडो डान्सरच्यामध्ये जलवा दाखवणारी कॅटरिना पाहून तुम्ही नव्याने तिच्या प्रेमात पडल्यावाचून राहणार नाहीत. सलमानही त्याच्या नेहमीच्या अंदाजात दिसतोय.
विशाल डडलानी आणि नेहा भसीन यांच्या आवाजातील हे गाणे पाहून चित्रपटगृहांत बसलेले लोक नाचायला लागणार हे नक्की. शानदार संगीत आणि गाण्याचे तेवढेच शानदार बोल या गाण्याचा आत्मा आहे. याशिवाय गाण्याची कोरिओग्राफीही जबरदस्त आहे. त्यामुळेच कॅटरिनाचे सेक्सी मुव्ज पाहून अनेक जण घायाळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. या गाण्यासाठी कॅटरिनाने दिवसरात्र एक केले होते आणि तिची हिच मेहनत फळास आली, असेच हे गाणे पाहिल्यानंतर वाटेल. येत्या डिसेंबरला रिलीज होऊ घातलेल्या ‘टायगर जिंदा है’मधील हे गाणे तुम्हाला कसे वाटले, ते आम्हाला सांगायला विसरू नका.
ALSO READ : २०० कोटी कमावले तरीही फ्लॉप म्हणूनच गणल्या जाईल ‘टायगर जिंदा है’! वाचा कारण!!
‘टायगर जिंदा है’हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. सलमान व कॅटरिना कैफचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट कबीर खानने दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट तुफान गाजला होता. पण ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट कबीरऐवजी अली अब्बास जफर दिग्दर्शित करतो आहे.सूत्रांचे खरे मानाल तर ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट यशराज बॅनरचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट आहे १४० कोटी. यात पब्लिसिटी, प्रचार आणि सलमान खानची फी जोडली तर हा बजेट कदाचित २०० कोटींच्या घरात पोहोचेल. त्यामुळे चित्रपट हिट करायचा तर याला बॉक्सआॅफिसवर किमान २५० कोटी कमवावे लागतील.