"सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्य खूप जवळ आलेले...", दोघांच्या नात्याबाबत प्रसिद्ध संगीतकाराचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:45 IST2025-10-09T10:44:31+5:302025-10-09T10:45:52+5:30
'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर ऐश्वर्या आणि सलमान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या अफेअरच्या जितक्या चर्चा रंगल्या तेवढंच त्यांचं ब्रेकअप आणि भांडणाबद्दलही बोललं गेलं. त्या दोघांसाठी वाईट वाटत वाटायचं असा खुलासा संगीतकार इस्माइल दरबार यांनी केला आहे.

"सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्य खूप जवळ आलेले...", दोघांच्या नात्याबाबत प्रसिद्ध संगीतकाराचा मोठा खुलासा
बॉलिवूडमधील अनेक लव्हस्टोरी गाजल्या. यापैकीच एक म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय. 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर ऐश्वर्या आणि सलमान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या अफेअरच्या जितक्या चर्चा रंगल्या तेवढंच त्यांचं ब्रेकअप आणि भांडणाबद्दलही बोललं गेलं. सलमान आणि ऐश्वर्या यांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. त्या दोघांसाठी वाईट वाटत वाटायचं असा खुलासा संगीतकार इस्माइल दरबार यांनी केला आहे.
इस्माइल दरबार यांनी संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' आणि 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमांसाठी संगीत दिलं होतं. विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत इस्माइल दरबार यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं. सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील वादामुळेच संजय लीला भन्साळींनी 'देवदास'मध्ये भाईजानऐवजी शाहरुख खानला घेतलं होतं. त्यामुळे संजय लीला भन्साळींवर सलमान नाराजही होता.
सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबाबत इस्माइल दरबार म्हणाले, "त्यांच्या भांडणाच्या बातम्या मीडियामध्ये यायच्या. त्यामुळे आम्हाला वाईट वाटायचं. सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या खूप जवळ होते. त्यांनी भांडणं करायला नको होते. पण, या गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत. सलमानही आता खूप मॅच्युअर झाला आहे. त्यामुळे याबाबत तो कधीच बोलत नाही".