सलमान कतरिनाने घालवला एकत्र वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 17:29 IST2016-06-20T11:59:46+5:302016-06-20T17:29:46+5:30
कतरिना कैफ आणि सलमान खान यांचे कपल सगळ्यांनाच खूप आवडतं. कतरिना आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपनंतर कतरिनाने सलमानची भेट ...

सलमान कतरिनाने घालवला एकत्र वेळ
क रिना कैफ आणि सलमान खान यांचे कपल सगळ्यांनाच खूप आवडतं. कतरिना आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपनंतर कतरिनाने सलमानची भेट घेतली होती. या भेटीमुळे सलमान आणि कतरिना पुन्हा एकत्र आले आहेत का असा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण त्यानंतर सलमान ल्युलियाशी लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या. यामुळे सलमान आणि कतरिनाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण सध्या कतरिनाचे ढासळलेले करियर सांभाळण्यासाठी सलमान तिला मदत करत आहे. कतरिनाला चित्रपटात घेण्यासाठी सलमानने काही निर्मात्यांकडे शब्दही टाकला असल्याचे म्हटले जात आहे. कतरिना आणि सलमान नुकतेच एका इफ्तार पार्टीत एकत्र आले होते. या इफ्तार पार्टीत सलमानचा भाचा अहिलला घेऊन अर्पिता आली होती. या छोट्याशा अहिलला पाहून कतरिना खूपच खूश झाली. ती त्याच्यासोबत खेळत होती. तेवढ्यात तिथे अहिलचा सलमान मामा आला. सलमानने लगेचच अहिलला उचलले आणि तो आणि कतरिना दोघे मिळून त्याला खेळवायला लागले. कतरिना आणि सलमानला एकत्र आणणे सध्या कोणासाठीच शक्य नसले तरी ते काम अहिलने करून दाखवले.