​सलमान महिला आयोगासमोर तिसऱ्यांदा गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 14:19 IST2016-07-15T08:48:55+5:302016-07-15T14:19:56+5:30

बलात्कार पिडित महिलेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्र महिला आयोगाने केलेल्या तक्रारीनूसार सलमानला आयोगासमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. ...

Salman female commission absent for the third time | ​सलमान महिला आयोगासमोर तिसऱ्यांदा गैरहजर

​सलमान महिला आयोगासमोर तिसऱ्यांदा गैरहजर

ात्कार पिडित महिलेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्र महिला आयोगाने केलेल्या तक्रारीनूसार सलमानला आयोगासमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तिसऱ्यादाही सलमान हजर राहू शकला नाही. पहिल्यांदा त्याने आपल्या वकिलांमार्फत पत्र पाठवले होते. हे प्रकरण आधीच राष्ट्रीय महिला आयोगाकडे असल्याने दोन ठिकाणी सुनावणी होऊ शकत नाही असे त्याने पत्रात म्हटले होते. गैरहजर राहण्याची सलमानची ही तिसरी वेळ आहे.
यावेळीही सलमाने आयोगाला पत्र पाठवले आहे. या पत्रात त्याने काय लिहिले आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. ‘पत्राविषयी आम्ही पूर्ण विचार करून मगच पुढील कारवाई करू’ असे महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगासमोरही सलमान हजर राहिलेला नाही.  

Web Title: Salman female commission absent for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.