सलमानसाठी ईद ठरते लकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 15:57 IST2016-07-06T09:34:58+5:302016-07-06T15:57:04+5:30

सुलतान हा सलमान खानचा चित्रपट या ईदला प्रदर्शित झालेला आहे. गेल्या काही वर्षांत सलमानचा चित्रपट म्हटला की तो हिट ...

Salman decides to have Eid Lucky | सलमानसाठी ईद ठरते लकी

सलमानसाठी ईद ठरते लकी

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">सुलतान हा सलमान खानचा चित्रपट या ईदला प्रदर्शित झालेला आहे. गेल्या काही वर्षांत सलमानचा चित्रपट म्हटला की तो हिट ठरणारच असे समीकरणच मानले जाते. सुलतान या चित्रपटासाठी तर सलमानने खूपच मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी त्याने कित्येक किलो वजन वाढवलेले आहे. सलमानच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा चित्रपट ठरू शकतो असे म्हटले जाते. सलमानचे आतापर्यंत अनेक चित्रपट ईदला प्रदर्शित झाले असून त्यातील अनेक चित्रपट हे हिट झाले आहेत. त्यामुळे सलमानसाठी ईद ही लकी मानली जाते आणि विशेष म्हणजे दरवेळी आधीच्या चित्रपटापेक्षा नव्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अधिक व्यवसाय केलेला आहे. त्यामुळे सुलतान हा चित्रपट 300 करोडपेक्षाही अधिक गल्ला जमवणार अशी चर्चा आहे. ईदला प्रदर्शित झालेल्या सलमानच्या या काही चित्रपटांवर नजर टाकूया... 
 
वाँटेड हा चित्रपट 2009च्या ईदला प्रदर्शित झाला. 120 करोडपेक्षा जास्त या चित्रपटाने गल्ला जमवला होता. याआधी सलमानच्या कोणत्याही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतका जास्त व्यवसाय केलेला नव्हता. या चित्रपटातील गाणी, सलमानचा अभिनय, त्याची स्टाईल सगळेच प्रेक्षकांना खूप आवडले होते. या चित्रपटाच्या आधी युवराज, हॅलो, गॉड तुसी ग्रेट हो, हिरोज यांसारखे अनेक फ्लॉप चित्रपट त्याने दिले होते. या चित्रपटातील मैंने एक बार कमिटमेंट करदी... हा संवाद प्रचंड गाजला होता.
 
वाँटेडच्या यशानंतर 2010च्या ईदला सलमानचा दबंग हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील चुलबुल पांडेची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटात पहिल्यांदाच प्रेक्षकांना मिशीतला सलमान पाहायला मिळाला. या चित्रपटातील गाणीही प्रचंड हिट झाली होती. या चित्रपटाने जवळजवळ 139 करोडचा व्यवसाय केला. या चित्रपटात सलमानने चांगला अभिनय केला नसल्याचे अनेक समीक्षकांचे म्हणणे होते. पण याचा काहीही परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावर झाला नाही. या चित्रपटातील काही संवाद तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. तसेच शर्टच्या मागच्या बाजूला गॉगल लावण्याची स्टाईल, दबंग या गाण्यातील सिगनिचर स्टेप या गोष्टी प्रचंड गाजल्या होत्या.

 
2011च्या ईदला बॉडीगार्डच्या भूमिकेत सलमान प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटातील संवाद, गाणी, अॅक्शन दृश्य, सलमान आणि करिना कपूरची केमिस्ट्री या सगळ्यामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 148 करोड कमवले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सलमानच्या डोळ्याला इनफेक्शन झाल्याने या चित्रपटात अनेक दृश्यात तो गॉगलमध्येच पाहायला मिळाला होता.


कतरिना कैफ आणि सलमानच्या जोडीचा एक था टायगर हा चित्रपट 2012 च्या ईदला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 198 करोड कमावले होते. 200 करोड कमवणारा सलमानचा हा पहिला चित्रपट ठरणार होता. पण केवळ काही करोडसाठी हा रेकॉर्ड एक था टायगरला करता आला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. या चित्रपटातील सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. 

2013च्या ईदला सलमानचा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने प्रेक्षकांची निराशा झाली होती. वर्षभरानंतर ईदला प्रदर्शित झालेल्या किक या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. 200 करोडपेक्षा जास्त व्यवसाय करणारा किक हा सलमानचा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 231 करोड कमवले होते. या चित्रपटातील हँगओव्हर हे गाणे स्वतः सलमानने गायले होते. या चित्रपटातील फ्रेंच दाढीतील त्याचा लूक त्याच्या चाहत्यांना आवडला होता.



 
 बजरंगी भाईजान हा चित्रपट सलमानच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट मानला जाते. 2015च्या ईदला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा विषय खूपच वेगळा होता. या चित्रपटात खूपच वेगळा सलमान प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. अॅक्शन दृश्य किंवा सलमानचा सिक्स पॅक्स या कोणत्याच गोष्टी चित्रपटात नसूनही हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. या चित्रपटातील सलमान आणि चिमुकली हर्षाली मल्होत्रा यांच्यातील नाते प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. या चित्रपटातील सलमानच्या अभिनयाचे केवळ त्याच्या फॅन्सनेच नव्हे तर समीक्षकांनीही कौतुक केले होते. या चित्रपटाने सलमानच्या आतापर्यंतच्या सगळ्या चित्रपटाचे रेकॉर्ड ब्रेक करत 300 करोडचा पल्ला गाठला. 320 करोड इतकी मोठी रक्कम या चित्रपटाने कमवली होती.

Web Title: Salman decides to have Eid Lucky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.