सलमान पुन्हा एकदा गाणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 21:09 IST2016-04-06T04:09:16+5:302016-04-05T21:09:16+5:30
हळूहळू बॉलिवूडमध्ये कलाकारांनीच गाणे गाण्याचा ट्रेंड रूजू होऊ पाहत आहे. श्रद्धा कपूर, आलिया भट, परिणीती चोपडा, प्रियंका चोपडा यांनी ...

सलमान पुन्हा एकदा गाणार!
ह ूहळू बॉलिवूडमध्ये कलाकारांनीच गाणे गाण्याचा ट्रेंड रूजू होऊ पाहत आहे. श्रद्धा कपूर, आलिया भट, परिणीती चोपडा, प्रियंका चोपडा यांनी अभिनयाबरोबरच त्यांच्या आवाजाचीदेखील कमाल दाखविली आहे.
अभिनेत्यांमध्ये सलमान खान आता गायक म्हणूनही आपली ओळख आणखी पक्की करताना दिसतोय.
‘किक’ आणि ‘हीरो’ चित्रपटांनंतर ‘भाईजान’ आणखी एका चित्रपटात गाणे गाणार आहे. रणदीप हुडाचा आगामी ‘लाल रंग’ या चित्रपटातील एका गाण्याला सलमान आवाज देणार आहे. भ्रष्टाचार, स्कॅम्स, घोटाळ्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
सलमान त्याच्या मैैत्रीपूर्ण स्वभावासाठी ओळखला जातो. मित्रांच्या मदतीसाठी तो सदैैव तयार असतो. ‘किक’ चित्रपटा दरम्यान रणदीप आणि त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. रणदीपच्या विनंतीवरूनच सलमान चित्रपटात गाणे गाण्यास तयार झाला.
सलमान-रणदीपची मैैत्री एवढी घट्ट आहे की, सलमानने त्याच्या आगामी ‘सुल्तान’ चित्रपटातही रणदीपचे नाव सुचवले. आता दोस्तासाठी काहीही करण्याचा सलमानचा स्वभावच निराळा!
आता त्याच्या आवाजाची जादू अनुभवण्याची आणखी एक संधी मिळणार म्हटल्यावर चाहते तर एकदम खुश होणार यात काही शंका नाही.