सुलतानच्या सेटवर सल्लुची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 05:10 IST2016-03-07T12:10:01+5:302016-03-07T05:10:01+5:30

           सलमान खान ज्या चित्रपटात आहे तो चित्रपट बॉक्सआॅफिसवर १०० करोड क्लबमध्ये शामील होणारच असे ...

Salluchi Dhamal on Sultan Set | सुलतानच्या सेटवर सल्लुची धमाल

सुलतानच्या सेटवर सल्लुची धमाल


/>           सलमान खान ज्या चित्रपटात आहे तो चित्रपट बॉक्सआॅफिसवर १०० करोड क्लबमध्ये शामील होणारच असे समजले जाते. आता सलमानचा एक आगामी चित्रपट सुलतान लवकरच त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची चर्चा सिनेवर्तुळात सुद्धा जोरदार सुरु आहे. सलमान देखील या चित्रपटातील छोट्या छोट्या गोष्टीं संदर्भात अपडेट करत असतो. आता त्याने नूकताच सुलतानच्या सेटवरील एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये सल्लुमिया चिल्लर पार्टी सोबत मस्त धमाल करताना दिसत आहे. शाळेच्या युनिफॉर्म मधील ही बच्चा गँग सुलतानमध्ये पहायला मिळणार का असे वाटत आहे. सगळ््यांच्या लाडक्या या भाईजानला त्याच्या छोट्या छोट्या फॅन्सनी गराडा घालुन धमाल केली आहे. 

Web Title: Salluchi Dhamal on Sultan Set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.