/> बॉलीवुडचा हॅन्डसम हंक.. तमाम तरुणींच्या दिल की धडकन असणारा आपला दबंग सल्लुमियाँ सध्या जाम खुष आहे. असे आम्ही नाही तर सलमान स्वत:च सांगतोय. आता सल्लुच्या आनंदी असण्याचे खरे कारण काय आहे असा विचार तर त्याच्या चाहत्यांना नक्कीच आला असेल. तर आपला सल्लुमिया हॅपी आहे कारण अनंत अंबानी याने १०८ किलो वजन कमी केले आहे म्हणुन. तुम्हाला तर माहितच आहे सलमान किती हेल्थ कॉन्शिअस आहे ते. बॉलीवुडमध्ये सिक्सपॅक अन शर्टलेस होऊन बॉडी दाखविण्याचे फॅड कोणी आणले असेल तर आपल्या सल्लुनेच. एवढेच नाही तर त्याने अनेक हिरो-हिरोईन्स ना हेल्थ टिप्स देऊन वेट लॉस करण्यास मदत केली आहे. ह्रतिक रोशन, अर्जुन कपुर, सोनाक्षी सिन्हा, जरीन खान, डेजी शहा अशी अनेक नावे आपल्याला बॉलीवुड इंडस्ट्रीत सापडतील ज्यांना सलमानने वेट रिड्युस करण्यासाठी सपोर्ट केला आहे. आताच पहा ना अनंत अंबानी याने जवळपास १०८ किलो वजन कमी केले असल्याने सलमान त्याला म्हणतोय, सो हॅपी टु सी अनंत अंबानी.. लॉट्स आॅफ रिसपेक्ट अॅन्ड सो हॅपी.