बडजात्यांचा 'प्रेम' पुन्हा येतोय, पाचव्यांदा प्रेम साकारत रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सलमान सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 12:18 PM2019-02-06T12:18:17+5:302019-02-06T12:23:18+5:30

बडजात्या यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'हम साथ-साथ है', 'प्रेम रतन धन पायो' या चार सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. त्यात प्रमुख अभिनेत्याची भूमिका सलमान खानने साकारली होती.

Salaman khan and Badjatya come together, fifth time ready to rock with playing Prem | बडजात्यांचा 'प्रेम' पुन्हा येतोय, पाचव्यांदा प्रेम साकारत रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सलमान सज्ज

बडजात्यांचा 'प्रेम' पुन्हा येतोय, पाचव्यांदा प्रेम साकारत रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सलमान सज्ज

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रेम पुन्हा येतोय. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी प्रेम पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. प्रेमाची व्याख्या पुन्हा एकदा नव्याने सांगण्यासाठी तसंच प्रेमाची जादू पुन्हा पसरवण्यासाठी प्रेम अर्थात अभिनेता सलमान खान सज्ज आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत राजश्री प्रॉडक्शन्स, सूरज बडजात्या आणि सलमान खान हे यशाचे सुपरहिट समीकरण ठरलं आहे. बडजात्यांच्या सिनेमात सलमानने साकारलेला प्रेम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला आहे. ‘मैंने प्यार किया’ ते ‘प्रेम रतन धन पायो' मधील प्रेम रसिकांची दाद मिळवून गेला. आता पुन्हा एकदा दबंग सलमान खान व दिग्दर्शक सूरज बडजात्या यांची जोडी एकत्र येत आहे. सलमान खान सूरज बडजात्या यांच्यासोबत त्यांच्या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल पाचव्यांदा एकत्र काम करणार आहे. 

बडजात्या यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'हम साथ-साथ है', 'प्रेम रतन धन पायो' या चार सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. त्यात प्रमुख अभिनेत्याची भूमिका सलमान खानने साकारली होती. बडजात्या यांचा हा आगामी सिनेमा नेहमीप्रमाणे फॅमिली ड्रामा असणार आहे. या चित्रपटाच्या कथेविषयीची कल्पना सलमानला दिली असून त्यालासुद्धा ती आवडल्याचे बडजात्या यांनी सांगितले आहे. सूरज यांचा मुलगा अविनाश बडजात्या या चित्रपटावर काम करत आहे. दुसरीकडे सलमान सध्या 'भारत' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यामुळे बडजात्या, सलमान आणि प्रेम हे समीकरण पाचव्यांदा हिट ठरणार का हे पाहावं लागेल. 

Web Title: Salaman khan and Badjatya come together, fifth time ready to rock with playing Prem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.