साक्षी तन्वरने ‘दंगल’मध्ये थापल्या गोवºया...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 18:04 IST2016-12-13T18:04:20+5:302016-12-13T18:04:20+5:30
what does sakshi tanvar in Dangal : making video ; ‘दंगल’ या चित्रपटात साक्षी तन्वर महावीर सिंग फोगटच्या पत्नीची भूमिका साकारत असून या भूमिकेसाठी तिने गोवºया थापल्या असून याचित्रपटाबाबतचे अनुभव शेअर केल आहेत.

साक्षी तन्वरने ‘दंगल’मध्ये थापल्या गोवºया...
‘दंगल’ हा चित्रपट कुश्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात आमिर खानने ‘महावीर सिंग’ची भूमिका साकारली असून साक्षी तन्वर ही महावीरची पत्नी ‘दया कौर’ या भूमिकेत दिसणार आहे. दया कौर ही भूमिका साकारताना साक्षीला काय करावे लागले हे ‘दंगल’च्या मेकिंग व्हिडीओमधून दाखविण्यात आले आहे.
या व्हिडीओमध्ये साक्षी या चित्रपटाबद्दलचे अनुभव शेअर करताना म्हणेत, जेव्हा दंगलसाठी मला फोन आला तेव्हा मला यावर विश्वासच बसला नव्हता. माझी कुणीतरी मस्करी करीत आहे असे मला वाटले. ‘दंगल’मधील दया कौर ही कधी मुलींची बाजू घेणारी तर कधी पतीची बाजू घेणारी महिला आहे, आमिर सोबत काम करताना मजा आली. यात माझ्या भूमिके ला वयाचे शेड्स असल्याने मला वेगवेगळळ्या प्रकारचे कॉस्च्युम घालायला मिळाले. यातील भाषा राजस्थानी व हरयाणवी मिक्स असल्याने ती बोलताना देखील खूप मजा आली.
याच व्हिडोओमध्ये आमिरने साक्षीची प्रसंशा करतान म्हणतो, ‘साक्षीला या चित्रपटात घेण्याचा विचार माझ्या अम्मीने दिला. ती टीव्हीवरील साक्षीच्या भूमिका असलेल्या मालिका पाहते, साक्षीचा अभिनय तिला आवडतो. साक्षी कामप्रती खूपच प्रामाणिक आहे. ती काम करताना त्या भूमिकेशी समरस होते’.
‘दंगल’ आॅन सेट विथ साक्षी तन्वर : मेकिंग व्हिडीओ