​साजिद खान व जॅकलिन फर्नांडिसच्या नकाराने केली साजिद नाडियाडवालांची गोची!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 10:16 AM2018-04-10T10:16:09+5:302018-04-10T15:46:09+5:30

बॉलिवूडचा सर्वाधिक महागडा कॉमेडी चित्रपट ‘हाऊसफुल4’ची स्क्रिप्ट तयार झालीय. चित्रपटाच्या प्री- प्रॉडक्शनचे कामही पूर्ण झाले आहे. केवळ इतकेचे नाही ...

Sajid Khan and Jacqueline Fernandes refused to accept Sajid Nadiadwala | ​साजिद खान व जॅकलिन फर्नांडिसच्या नकाराने केली साजिद नाडियाडवालांची गोची!!

​साजिद खान व जॅकलिन फर्नांडिसच्या नकाराने केली साजिद नाडियाडवालांची गोची!!

googlenewsNext
लिवूडचा सर्वाधिक महागडा कॉमेडी चित्रपट ‘हाऊसफुल4’ची स्क्रिप्ट तयार झालीय. चित्रपटाच्या प्री- प्रॉडक्शनचे कामही पूर्ण झाले आहे. केवळ इतकेचे नाही शूटींगची तयारीही जवळपास पूर्ण झाली आहे. पण इतके सारे असूनही  चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्यापुढे एक समस्या आ वासून उभी ठाकलीय.



होय, ‘हाऊसफुल’ सीरिजमध्ये आत्तापर्यंत जितके कलाकार दिसले ते सगळे ‘हाऊसफुल4’मध्ये असावेत, अशी साजिद नाडियाडवाला यांची इच्छा होती. पण नेमकी इथेच माशी शिंकली. ‘हाऊसफुल4’ साजिद खान दिग्दर्शित करणार, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. नेमक्या याचमुळे साजिद नाडियाडवाला यांच्या इच्छेला सुरूंग लागला. तो कसा तर जॅकलिन फर्नांडिस या चित्रपटातून बाद झाली. साजिद खान व जॅकलिनचे एकेकाळचे लव्ह रिलेशन तर तुम्हाला ठाऊक आहेच. पुढे हे संबंध नको इतके बिनसलेत. याचा परिणाम म्हणजे, साजिद नाडियाडवाला यांनी साजिद खानला जुन्या स्टारकास्टबद्दल छेडताच, साजिदने म्हणे जॅकलिनच्या नावावर फुली मारली. साजिदने जॅकसोबत काम करण्यास नकार दिला. तसाच जॅकनेही साजिदसोबत काम करण्यास ‘ना’ केले. या नकाराने साजिद नाडियाडवाला यांच्यासमोर धर्मसंकट उभे केले. कारण दोघांच्याही नकारानंतर साजिद किंवा जॅकलिन यापैकी एकाची निवड त्यांना करायची होती. अखेर अनेक विचारांती नाडियाडवाला यांनी म्हणे साजिदच्या नावाला पसंती दिली.

ALSO READ : जॅकलिन फर्नांडिस पडली, अडखळली; पण शेवटी जिंकलीच..! पाहा, व्हिडिओ!!

सूत्रांचे मानाल तर साजिद व जॅक यापैकी एकाची निवड करणे नाडियाडवाला यांच्यासाठी सोपे नव्हते. पण त्यांनी साजिदच्या नावाला पसंती दिली. खरे तर साजिद नाडियाडवाला आणि जॅकलिन यांच्यातील प्रोफेशनल नाते बरेच जुने आहे. दोघांनीही ‘हाऊसफुल’,‘हाऊसफुल२’,‘हाऊसफुल३’,‘ढिशूम’,‘बागी2’, ‘किक’ यासारख्या चित्रपटात सोबत काम केले आहे. साजिद नाडियाडवाला बॅनरखाली बनलेले अलीकडचे काही सुपरहिट सिनेमे बघितल्यास त्यात जॅकलिन कुठल्या ना कुठल्या रूपात दिसतेच. मग ती डान्स नंबरसाठी असो वा हिरोईन म्हणून असो. पण दुुदैवाने ‘हाऊसफुल4’मध्ये जॅक नसणार आहे.

Web Title: Sajid Khan and Jacqueline Fernandes refused to accept Sajid Nadiadwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.