सैफ म्हणतो, दिल्ली बेल्लीपेक्षा वेगळा चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 14:58 IST2016-06-07T09:28:06+5:302016-06-07T14:58:06+5:30
दिल्ली बेल्ली या चित्रपटापेक्षा आपला येणारा चित्रपट वेगळा असेल, असे मत अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केले. अक्षत ...

सैफ म्हणतो, दिल्ली बेल्लीपेक्षा वेगळा चित्रपट
द ल्ली बेल्ली या चित्रपटापेक्षा आपला येणारा चित्रपट वेगळा असेल, असे मत अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केले. अक्षत वर्मा हा चित्रपटाचा दिग्दर्शक असेल.
दिल्ली बेल्ली या चित्रपटासारखाच हा चित्रपट असेल काय या प्रश्नावर बोलताना सैफ म्हणाला, ‘मला असे वाटत नाही. थोडाफार वेगळा असेल. तुम्ही अक्षत वर्मालाच विचारा. तो खूप छान दिग्दर्शक आहे. तो कथाही चांगली लिहितो. तो अभिनय करायलाही शिकवितो. त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे.’
तत्पूर्वी अक्षतचा चित्रपट प्रॉडक्शन हाऊसने बंद केला असून, अभिनेत्री अनुष्का शर्मा हा चित्रपट निर्माण करणार असल्याचे सांगण्यात येत होते. सैफ तो चित्रपट करणार होता, अर्थात त्याची खात्री होऊ शकलेली नाही.
अभिनेता अक्षय ओबेरॉय याने पिझ्झा, फितूर, लाल रंग त्याचप्रमाणे पिकू चित्रपटात काम केले आहे.
‘सध्या रिहर्सल सुरू आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात शुटींग सुरूवात होईल. मी खूप उत्सुक आहे, हा माझ्यासाठी खास चित्रपट आहे. काम करताना मजा येईल. अक्षत हा खूप चांगला चित्रपट तयार करत असल्याचे अक्षयने सांगितले.