सैफने सुरू केले ‘शेफ’चे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 18:46 IST2016-12-05T18:46:21+5:302016-12-05T18:46:21+5:30

सैफ अली खान याने राजा कृष्णा मेनन दिग्दर्शित ‘शेफ’ चित्रपटाच्या शूटिंगला दिल्लीच्या चांदणी चौकमध्ये सुरूवात केली आहे. त्याच्यासोबत त्याचा ...

Saif launches 'Chef' shoot | सैफने सुरू केले ‘शेफ’चे शूटिंग

सैफने सुरू केले ‘शेफ’चे शूटिंग

फ अली खान याने राजा कृष्णा मेनन दिग्दर्शित ‘शेफ’ चित्रपटाच्या शूटिंगला दिल्लीच्या चांदणी चौकमध्ये सुरूवात केली आहे. त्याच्यासोबत त्याचा आॅनस्क्रीन मुलगाही शूटिंगमध्ये व्यस्त आहे. स्वर कांबळे असे या मुलाचे नाव असून त्याची प्रसिद्धी न करण्याचे चित्रपटाच्या टीमने ठरवलेय. कारण तो एक लहान मुलगा आहे. त्याची जर प्रसिद्धी झाली तर लोक त्याला विनाकारण त्रास देतील. स्वर हा एक खुपच हुशार मुलगा असल्याचे मेनन सांगतात.

                          

सैफ आणि स्वरचे नाते सांगताना मेनन म्हणतात,‘सैफने स्वरच्या वडिलांची भूमिका केली असून त्यांच्यात खरंचच एका वडील-मुलांचं नातं निर्माण झाले आहे. स्वरची निवड जवळपास १०० मुलांमधून करण्यात आली आहे. मी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा मला वाटलं की, होय हाच आहे तो. त्याच्या कुटुंबाकडून त्याला मिळणारा पाठिंबा आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्याच्या भूमिकेभोवती फिरणारं चित्रपटाचं  कथानक आहे. सैफनेही शूटिंगअगोदर स्वरसोबत खुप गप्पा मारल्या. लहान मुलांचं विश्व जाणून घेतलं. त्यानंतरच खºया अर्थाने शूटिंगला सुरूवात केली. 

सैफ अली खान हा आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही बाबा होणार आहे. डिसेंबरमध्ये करिना त्यांच्या बाळाला जन्म देणार आहे. त्याचबरोबर सैफने शेफची शूटिंग सुरू केल्याने त्याला लहान मुलांसोबत राहण्या, बोलण्याची चांगलीच सवय होत आहे. स्वरसोबत शूटिंग करणं म्हणजे त्याच्यासाठी आता खरंच आनंददायी बाब आहे.

Web Title: Saif launches 'Chef' shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.