सारा अली खानमुळे का उडाली सैफ अली खानची रात्रीची झोप..वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 16:04 IST2017-09-29T10:33:41+5:302017-09-29T16:04:48+5:30

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. सध्या ती आपला आगामी चित्रपट ...

Saif Ali Khan's Saud Ali Khan's Night Out ... | सारा अली खानमुळे का उडाली सैफ अली खानची रात्रीची झोप..वाचा सविस्तर

सारा अली खानमुळे का उडाली सैफ अली खानची रात्रीची झोप..वाचा सविस्तर

फ अली खानची मुलगी सारा अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. सध्या ती आपला आगामी चित्रपट केदारनाथ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्या अपोझिट सुशांत सिंग राजपूत दिसणार आहे. चित्रपटाची शूटिंग सुरु होण्यापूर्वी मेकर्स चित्रपटाचे एक मोशन पोस्टर रिलीज केले होते.  सारा आपल्या डेब्यूला घेऊन रोज वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. तर तिकडे साराचे बाबा सैफ अली खान याची रात्रीची झोप उडाली आहे. सैफ आपल्या मुलां घेऊन खूप प्रोटेक्टिव आहे. सैफची इच्छा नव्हती की साराने इंटस्ट्रीमध्ये काम करावे. त्याने काही दिवसांपूर्वीच साराला ही गोष्ट सांगितली होती ज्यावेळी तिने चित्रपटात काम करण्यासंबंधी सैफला सांगितले होते. साराची इच्छी असल्यामुळे सैफने तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला.  

साराने अभिषेक कपूरचा चित्रपट केदारनाथ साईन केला होता.  आता ती चित्रपटाची शूटिंगमध्ये पूर्ण पणे व्यस्त आहे. मात्र आता सैफ अली खानला भीती वाटतेय लेकीचा पहिलाच चित्रपट फ्लॉप जाईल याची आणि यामुळे साराचे मन दुखावले जाईल. मिड-डेमध्ये दिलेल्या एक इंटरव्ह्यु दरम्यान सैफने सांगितले होते की, ''माझी सारा प्रती असणारी काळजी खूपच स्वाभाविक आहे. मी नर्वस नाही आहे तर मला खूप काळजी आहे. जर तिचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला तर तिची ती काय रिअॅक्ट करेल. या गोष्टीची मला खूप काळजी आहे.    

ALSO READ :  केदारनाथच्या सेटवर सारा अली खान दाखवतेय नखरे ?

सैफ लेकीच्या काळजीत असला तरी आई अमृता सिंग मात्र खूपच कॉफिडेंट आहे. पुढच्या वर्षी साराचा केदारनाथ बॉक्स ऑफिसवर रिलीज होतो आहे. हा चित्रपट  उत्तराखंडमध्ये 2013 मध्ये आलेल्या पुरपरिस्थितीवर आधारित आहे. सारा एक श्रीमंत घरातील मुलगी दाखवण्यात येणार आहे.  सुशांत सिंग राजपूत पिट्टूच्या भूमिकेत दिसणार आहे. हा पिट्टू श्रीमंत घरातल्या मुलीच्या प्रेमात पडतो. अभिषेक कपूर जवळपास एक वर्ष चित्रपटाच्या कथेवर काम करत होता. सध्या हिमालयामध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे.   

Web Title: Saif Ali Khan's Saud Ali Khan's Night Out ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.