सैफ अली खानने करिना कपूरसोबत लग्न करण्याआधी अमृता सिंगला दिली होती ही खास वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 14:07 IST2021-02-08T14:06:05+5:302021-02-08T14:07:43+5:30

सैफ अलीचे करिनाच्याआधी अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न झाले होते. अमृता आणि सैफ यांचा प्रेमविवाह झाला होता.

Saif Ali Khan Wrote A Letter To Ex Wife Amrita Singh before marrying kareena kapoor | सैफ अली खानने करिना कपूरसोबत लग्न करण्याआधी अमृता सिंगला दिली होती ही खास वस्तू

सैफ अली खानने करिना कपूरसोबत लग्न करण्याआधी अमृता सिंगला दिली होती ही खास वस्तू

ठळक मुद्देसैफचे करिनासोबत लग्न झाले, त्या दिवशी सैफने त्याची पहिली पत्नी अमृता सिंगसाठी एक पत्र लिहिले होते आणि हे पत्र अमृताला देण्याआधी करिनाला वाचायला दिले होते.

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक जोडी म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूर खान. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. १६ ऑक्टोबर २०१२ साली सैफ आणि करिना लग्नबेडीत अडकले होते. त्यांच्या लग्नाला आता आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव तैमूर आहे. तो लहानपणापासून प्रचंड लोकप्रिय आहे. तर करिना आणि सैफ आता दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत.



सैफ अलीचे करिनाच्याआधी अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न झाले होते. अमृता आणि सैफ यांचा प्रेमविवाह झाला होता. सैफने लग्नाच्या दिवशी एक अशी गोष्ट केली होती की, यामुळे करिनाला सैफबद्दल असलेला आदर कित्येक पटीने वाढला होता. कॉफी विथ करण ६ या कार्यक्रमात सैफ आणि त्याची मुलगी सारा अली खान काही वर्षांपूर्वी झळकले होते. त्यावेळी सैफने त्याच्या आयुष्यातील अनेक गुपिते शेअर केली होती. सैफ अली खान आणि करिना यांच्या लग्नाच्या दिवशी सैफने एक खास गोष्ट केली होती आणि ही गोष्ट काय होती याविषयी त्याने या कार्यक्रमात सांगितले होते.

सैफचे करिनासोबत लग्न झाले, त्या दिवशी सैफने त्याची पहिली पत्नी अमृता सिंगसाठी एक पत्र लिहिले होते आणि हे पत्र अमृताला देण्याआधी करिनाला वाचायला दिले होते. सैफ लग्न करून एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याने त्याने हे पत्र लिहिले होते. हे सैफने करिनाला वाचायला दिले ही गोष्ट तिला खूप आवडली होती आणि हे पत्र लगेचच अमृताला पाठवावे असे करिनाने त्याला सांगितले होते. करिना नेहमीच प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीशी उभी राहिली आहे असे त्याने कॉफी विथ करण या कार्यक्रमात आवर्जून सांगितले.



'टशन' सिनेमाच्या सेटवर सैफ करिना भेटले आणि दोघांतली जवळीक वाढू लागली. टशन सिनेमात सैफ, करिनासह अक्षय कुमारसुद्धा होता. त्यावेळी सैफचा स्वभाव करिनाला भावला. महिलांप्रती सैफच्या मनातील आदर पाहून ती त्याच्या प्रेमात पडली.

 

Web Title: Saif Ali Khan Wrote A Letter To Ex Wife Amrita Singh before marrying kareena kapoor