सैफ अली खान बदलणार तैमूरचे नाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 17:23 IST2017-02-22T11:06:32+5:302017-02-22T17:23:27+5:30

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याने आपल्या बाळाचे नाव तैमूर ठेवल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. आता सैफ अली ...

Saif Ali Khan will change the name of Timur! | सैफ अली खान बदलणार तैमूरचे नाव!

सैफ अली खान बदलणार तैमूरचे नाव!

लिवूड अभिनेता सैफ अली खान याने आपल्या बाळाचे नाव तैमूर ठेवल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. आता सैफ अली खानने एक मोठा निर्णय घेत आपल्या बाळाचे नाव बदलविण्याचे ठरविले आहे. हा निर्णय एकट्या सैफने घेतला आहे. तैमूरचे नाव बदलण्याच्या निर्णयावर करिनाचा पारा चढू शकतो असे सांगण्यात येत आहे.  

सध्या चर्चेत असलेल्या बातम्यानुसार, सैफ अली खान आपला मुलगा तैमूरचे नाव बदलू शकतात. सैफच्या मते, जर तैमूरला शाळेत आपल्या नावामुळे त्रास सहन करावा लागला तर तो मुलाचे नाव बदलण्यात एका क्षणाचाही विलंब करणार नाही. सैफ म्हणाला, लोकांना वाटते की, तैमूरलंगच्या नावावर मी माझ्या बाळाचे नाव ठेवले आहे. मात्र असे नाहीच, परंतु, जर माझ्या मुलाला त्याच्या नावामुळे त्रास झाल्यास त्याचे नाव बदलण्यास मी तयार असेन. 



मागील वर्षी २० डिसेंबरला करिना कपूरने सैफच्या मुलाला मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये जन्म दिला होता. त्यांनी आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले होते. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर काही लोकांनी तैमूर या नावावर आक्षेप नोंदविला होता. करिना कपूर व सैफ अली खान यांच्या मुलाचे नाव सैफिना किं वा ऐतिहासिक असेल असे करिना कपूर बाळाच्या जन्माच्या आधीपासूनच सांगत होती. दरम्यान सैफ व करिना यांना मुलगा झाल्यावर त्याचे नाव तैमूर असे ठेवण्यात आले, मात्र हे नाव त्याच्या चाहत्यांना आवडले नाही व त्यांनी टीकेची झोड उठविली. 

तैमूर या नावावर टीका करणारे १४ व्या शतकातील मुस्लिम सम्राट तैमूरलंग याचा दाखला देत होते. तैमूरलंग याने आपल्या साम्राज्य विस्तारासाठी अनेक देशावर विजय प्राप्त केला. यासाठी त्याने अनेक लोकांच्या कत्तली केल्या, त्याला शत्रूंचे शीर कापून त्याचा ढीग रचण्यात आनंद मिळत होता असे सांगण्यात येते. यामुळेच सैफने आपल्या मुलाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 

जगाच्या नजरेत तैमूरच्या नवाचा अर्थ काहीही असला तरी तो त्याच नावाने ओळखला जाईल. त्याच नावाने तो आता वाढतो आहे. जगासाठी आम्ही त्याचे नाव बदलले असले तरी आमच्यासाठी तो तैमूरच असेल असेही सैफ अली खान म्हणाला. आता हा निर्णय तैमूरची आई करिनाला किती आवडतो हे लवकरच कळेल. 

Web Title: Saif Ali Khan will change the name of Timur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.