सैफ अली खान म्हणतो, साराच्या जीवनात माझी भूमिका मार्गदर्शक मित्रासारखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 16:36 IST2016-12-20T16:36:27+5:302016-12-20T16:36:27+5:30
सैफ अली खान व करिना कपूर यांना मुलगा झाल्याने संपूर्ण पतौडी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. नव्या बाळाच्या स्वागतात आनंदी ...

सैफ अली खान म्हणतो, साराच्या जीवनात माझी भूमिका मार्गदर्शक मित्रासारखी
मागील काही दिवसांपासून सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. सारा करण जोहरच्या स्टुडंट आॅफ द इअर २ मधून डेब्यू करणार अशी बातमी आली होती. यानंतर ती हृतिकच्या अपोझिट डेब्यू करेल अशी चर्चा रंगली. दरम्यान सारा व शाहरुखचा मुलगा आर्यन खान एकत्र डेब्यू करणार ही बातमी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द इअर’मधून साराला वगळल्याच्या बातमीवर खुलास देत साराची आई अमृता सिंग हिने, मी माझ्या मुलांना मोकळीक दिली आहे, साराने आपले करिअर स्वत: निवडले आहे असे सांगितले होते. आता वडील सैफने आपली बाजू मांडली आहे.
सैफ म्हणाला, साराबद्दल माझ्यात खूप उत्सुकता आहे. वडील व मुलगी असे आमचे नाते आश्चर्यकारकरित्या चांगले आहे. मित्र, मार्गदर्शक व तत्त्वज्ञानी असा आमच्या नात्याचा उल्लेख करावा लागेल. आम्ही दोघे अनेक गोष्टींवर चर्चा करतो. नुकत्याच आम्ही इटलीमध्ये सुट्या घालविल्या. येथे आम्ही कला, जीवन आणि करिअर, बॉलिवूड चित्रपट याबद्दल एकमेकांसोबत स्पष्ट बोललो. मी तिला सल्लेही दिली. मी म्हणालो, तू दहा गोष्टी लिहून घे आणि त्याच्यानुसार वागण्याचा प्रयत्न कर. हे सर्व तू शिकू शकतेस. तुझ्या आईकडून (अमृता सिंग) बरेच काही शिकता येणार आहे. मी जेव्हा मुंबईत आलो होतो तेव्हा तिने मला बºयाच गोष्टी सांगितल्या होत्या.
साराच्या बॉलिवूड करिअरची जबाबदारी अमृता सिंग हिने घेतली आहे. यामुळेच साराच्या प्रत्येक निणर्यासाठी अमृता सिंगला जबाबदार धरले जाते. आता मात्र सैफने अप्रत्यक्षरित्या अमृता सिंग हिची पाठराखण केली आहे.