सैफवर हल्ला झाला तेव्हा घरात कोण कोण होतं? कुठे होते तैमूर, जेह आणि करीना कपूर? जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:15 IST2025-01-16T11:15:44+5:302025-01-16T11:15:59+5:30

सैफवर हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? मुलं तैमूर अन् जेह कुठे होते? 

Saif Ali Khan Injured In Knife Attack At Mumbai Home Where Was Kareena Kapoor And Taimur, Jeh When Robber Attacked | सैफवर हल्ला झाला तेव्हा घरात कोण कोण होतं? कुठे होते तैमूर, जेह आणि करीना कपूर? जाणून घ्या डिटेल्स

सैफवर हल्ला झाला तेव्हा घरात कोण कोण होतं? कुठे होते तैमूर, जेह आणि करीना कपूर? जाणून घ्या डिटेल्स

 Saif Ali Khan Injured In Knife Attack: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यवर जीवघेणा हल्ला झाला आहे.  एक अज्ञात व्यक्तीने घरात घुसून  सैफ अली खानवर चाकूने ६ वार केले. मध्यरात्री २ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर ताबडतोब सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफ अली खानच्या शरीरावर ६ जखमा असून त्याची सर्जरी करण्यात आली आहे. सैफवर हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? मुलं तैमूर अन् जेह कुठे होते? 

वांद्रयातील राहत्या घरात सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा कुटुंबही घरी उपस्थित होते. पत्नी करीना कपूर आणि मुले तैमूर आणि जेह (Kareena Kapoor and Taimur, Jeh ) देखील घरी उपस्थित होते. सैफचा सुरक्षा रक्षक आणि ड्रायव्हर जखमी अभिनेत्याला रुग्णालयात घेऊन गेलं. तर करिश्मा कपूरही रात्री उशिरा तिथे पोहोचली. जेव्हा सैफ अली खानला ऑपरेशनसाठी नेण्यात आले, तेव्हा मुले घरी एकटी असल्याने करीना कपूर घरी परतली. यानंतर सैफची बहीण सोहा अली खान आणि तिचा पती कुणाल खेमू देखील रुग्णालयात पोहोचले.

प्रथम मोलकरणीवर हल्ला 
हल्ला पहिला सैफच्या घरातील मोलकरणीवर करण्यात आला. मोलकरीण आणि हल्लेखोर यांच्यातील भांडण ऐकून सैफ त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि याच दरम्यान हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला. चाकूच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर संधी साधून चोर तिथून पळून गेला. तोपर्यंत कुटुंबातील इतर सदस्य जागे झाले. अज्ञात व्यक्ती नेमका चोरीच्या उद्देशानेच शिरला होता का याबद्दल अधिकची माहिती पोलीस घेत आहेत. सैफ शुद्धीत आल्यानंतर त्याच्याकडून अधिकची माहिती घेण्यात येणार आहे.

Web Title: Saif Ali Khan Injured In Knife Attack At Mumbai Home Where Was Kareena Kapoor And Taimur, Jeh When Robber Attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.